सलग चौथ्या सत्रात घसरण नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने बुधवारी २९ हजारांची पातळीही सोडली. ११७.०३ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक २८,८८३.११ पर्यंत खाली आला, तर दोन दिवसांपूर्वीच ८,८०० लांब जाणारा निफ्टी बुधवारी ३२.८५ अंश घसरणीसह ८,७२३.७० वर बंद झाला.
सत्रात मुंबई निर्देशांकाने २८,८२४.६८ पर्यंत तळ नोंदविला. गेल्या चार व्यवहारांतील सेन्सेक्सची घसरण ७९८.६६ अंशांची राहिली आहे. आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारातील निराशा आणि स्थानिक पातळीवर गुंतवणूकदारांची नफेखोरी यामुळे येथील प्रमुख निर्देशांक पंधरवडय़ाच्या नव्या तळात विसावले.
सेन्सेक्समधील अॅक्सिस बँक, भेल, स्टेट बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस, मारुती सुझुकी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल या समभागांचे मूल्य ढासळले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक निर्देशांक १.२३ टक्क्यांसह घसरणीत वरच्या स्थानावर राहिला.
सेन्सेक्समधील निम्मे समभाग घसरणीच्या यादीत होते. प्रामुख्याने भांडवली वस्तू, बँक समभागांमध्ये नफेखोरीचे चित्र दिसले. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचा बुधवारचा प्रवास ८,७९२.८५ ते ८,७०४.४० दरम्यान राहिला. आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते, तर युरोपातील प्रमुख निर्देशांकांमध्ये सुरुवातीची घसरण नोंदली जात होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा