वाढती आयात आणि घसरती निर्यात कायम राहिल्याने गेल्या महिन्यातील देशाची व्यापार तूट १३.३५ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. तूट आधीच्या महिन्यातील १४.२४ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा कमी असली तरी वर्षभरापूर्वीच्या, ऑक्टोबर २०१३ मधील १०.५९ अब्ज डॉलरपेक्षा ती विस्तारली आहे.
ऑक्टोबरमध्ये ५.०४ टक्के घसरण नोंदविताना देशाची निर्यात गेल्या सहा महिन्यांनंतर प्रथमच नकारात्मक स्थितीत येऊन ठेपली आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण, रत्ने व दागिने या क्षेत्रांत भारताकडून मागणी राहिलेली नाही. ही तिन्ही क्षेत्रे यंदा उणे स्थितीत आली आहेत. मार्चमध्ये यापूर्वी निर्यात नकारात्मक स्थितीत होती. त्या वेळी निर्यात ३.१५ टक्क्यांनी कमी झाली होती. यंदा अमेरिका तसेच युरोपीय राष्ट्रांमधून मागणी कमी असल्याने निर्यात घसरली आहे.
सोन्याबरोबच तेल आयातही यंदा १९.२ टक्क्यांनी घसरली असून ती १२.३६ अब्ज डॉलर झाली आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या सात महिन्यांत निर्यात ४.७२ टक्क्यांनी वाढून १८९.७९ अब्ज डॉलर झाली आहे, तर याच कालावधीत आयात १.८६ टक्क्यांनी वाढून २७३.५५ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे या सात महिन्यांतील व्यापार तूट मात्र आधीच्या कालावधीतील ८७.३१ अब्ज डॉलरवरून यंदा ८३.७५ अब्ज डॉलपर्यंत घसरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा