निधी उभारणी आणि स्पर्धात्मक व्यवसायात वर्षभर चर्चेत राहिलेल्या ई-कॉमर्स व्यासपीठाद्वारे भांडवली बाजाराच्या माध्यमातून ११.४९ अब्ज डॉलरचे व्यवहार नोंदले गेले असून गेल्या वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण दुहेरी आकडय़ातील वाढीचे, १७ टक्के आहे.
‘पीडब्ल्यूसी’ या आंतरराष्ट्रीय वित्त सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार, २२ डिसेंबपर्यंत २०१४ मध्ये देशातील खासगी समभाग गुंतवणूक १,१४९ कोटी डॉलर झाली आहे. वर्षभरात याबाबत झालेल्या ४५९ व्यवहारांमध्ये कंपन्यांच्या स्थावर मालमत्ता व्यवहारांचाही समावेश आहे. आधीच्या वर्षांत ४६९ व्यवहारांमार्फत ९७८ कोटी डॉलरची खरेदी-विक्री झाली. व्यवहार संख्येत यंदा घसरण झाली असली असली तरी मूल्याबाबतचे व्यवहार हे प्रामुख्याने ई-कॉमर्समधील घडामोडींमुळे वाढल्याचे निरीक्षण ‘पीडब्ल्यूसी’ने नोंदविले आहे. या क्षेत्रातील ४८ व्यवहार हे २४७ कोटी डॉलरचे राहिले आहेत. गेल्या वर्षी ते ३६ व्यवहारांमार्फत ५५ कोटी डॉलरचे होते. ई-कॉमर्समध्ये माहिती तंत्रज्ञान व्यासपीठावरील क्षेत्राचा हिस्सा ४८२ कोटी डॉलरचा राहिला असून गेल्या वर्षीपेक्षा तो यंदा दुप्पट नोंदला गेला आहे.
क्षेत्रीय व्यवहारांमध्ये वित्त क्षेत्रात १७७ कोटी डॉलर तर अभियांत्रिकी व बांधकाम क्षेत्रात १५३ कोटी डॉलरचे व्यवहार झाले आहेत. निर्मिती आणि आरोग्य निगा क्षेत्राने मात्र यंदा निराशाजनक कामगिरी बजाविली आहे. या दोन्ही क्षेत्रांतील व्यवहार अनुक्रमे ६२ व ३३ टक्क्य़ांनी घसरले आहेत. ते ४५ कोटी डॉलर व ८६ डॉलर राहिले आहेत. नव्या वर्षांत आरोग्य निगा, जीवन विज्ञान क्षेत्रात व्यवहार वाढण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे. तर ई-कॉमर्स व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील खरेदी-विक्री व्यवहारही तेजीत राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा