‘लेहमन ब्रदर्स’रुपी अमेरिकेतील जागतिक आर्थिक मंदीची पाचवी ‘अॅनिव्हर्सरी’ (१५ सप्टेंबर) आठवडावर येऊन ठेपली असताना आणि भारतीय अर्थव्यवस्था उदारीकरणाच्या (१९९१) भूतकाळात पुन्हा प्रवेश करत असल्याचे चित्र असतानाच अर्थस्थितीचे दिशादर्शक मंगळवारी झपकन फिरले. सेन्सेक्सने एकाच व्यवहारात गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी उसळी घेत निर्देशांकाला २० हजाराच्या वेशीवर नेऊन ठेवले. तर सलग तिसऱ्या दिवशी वधारणारा रुपया आता गेल्या दोन आठवडय़ाच्या उंच्चांकावर पोहोचला आहे.
ऑगस्टमध्ये गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचली देशाच्या निर्यातीमुळे व्यापार तूट चार महिन्यात कमी नोंदली गेली आहे. नऊ महिने घसरती विक्री नोंदविणाऱ्या भारतीय वाहन क्षेत्राने ऑगस्टच्या वाढत्या आकडेवारीने यंदाच्या सणांचा बार उडवून दिला आहे.
सेन्सेक्स/निफ्टी
आयात/निर्यात
वाहन विक्री
वाहन निर्मिती क्षेत्राने सलग नऊ महिने घसरती विक्री नोंदविल्यानंतर ऑगस्टमध्ये १५.३७ टक्के वाढ राखली आहे. वर्षभरापूर्वीच्या १,१५,७०५ प्रवासी वाहनांच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टमध्ये १,३३,४८६ वाहने विकली गेली आहेत. तर दुचाकी क्षेत्राची वाढ ३.८२ टक्के राहिली आहे. गेल्या महिन्यात दुचाकींची विक्री ८ लाखाला स्पर्श करती झाली आहे. चांगल्या मान्सूनचे कारण दुचाकी विक्रीतील वाढीला दिले जात आहे. वाहन उद्योगाच्या संघटनेने मात्र सध्याची इंधनदरवाढ कायम असल्याने आगामी काळ आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे. गेल्या महिन्यात आलेल्या राखी पौर्णिमेनिमित्ताने अनेक कंपन्यांनी वाहनांवर सूट सवलती लागू केल्या होत्या. तसेच
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा