भारताच्या अर्थव्यवस्थेला दीर्घावधीत ८ ते १० टक्केदराने संयत रूपात विकास साधणे शक्य दिसून येते, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. अरविंद पानगढिया यांनी येथे विश्वास व्यक्त केला.
आगामी १५ वर्षे तरी दरसाल ८ टक्के ते १० टक्के या दरम्यान चिंरतन रूपात आर्थिक विकास साधता येणे भारताबाबत शक्य दिसते. भारताबाबत सर्व शक्यता उत्तम आहेत आणि सरकारच्या वृद्घीपूरक धोरणांचे त्याला पाठबळ मिळत आहे, असे पानगढिया यांनी मोदी सरकारने स्वीकारलेली आर्थिक धोरणे आणि सुधारणांचा उल्लेख करीत सांगितले.
पायाभूत क्षेत्राला गती प्राप्त झाली आहे आणि पर्यावरण तसेच कोळशाबाबत निर्माण झालेले अडसरही दूर झाले आहेत, असे त्यांनी सिंगापूर-भारत व्यापार संवाद २०१५ नावाच्या सिंगापूर मॅनेजमेंट विद्यापीठात आयोजित परिसंवादात बोलताना सांगितले.
गेल्या सलग तीन महिन्यांमध्ये भांडवली वस्तूंच्या निर्मितीने १० टक्क्यांच्या दराने प्रगती केली आहे. विदेशातून वाढलेला गुंतवणुकीचा ओघ हेदेखील चांगले लक्षण आहे.
तरीही सिंगापूरकडून शिकता येईल असे भारतासाठी भरपूर काही आहे. विशेषत: भारताच्या सॉफ्टवेअर उद्योगाला या शहराच्या अनुभवातून काही धडे गिरवावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा