चालू आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धातही भारतीय अर्थव्यवस्था सावरण्याची चिन्हे नाहीत, असे मूडी या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. देशातील निश्चित गुंतवणूक आणि निर्मिती क्षेत्राचा सध्याचा प्रवास पाहता हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांत क्षमता असूनही भारतीय अर्थव्यवस्थेची गती कमी राहिल्याचे मत प्रदर्शित करत देशाचा विकास दर आता पुढील वर्षीच वाढताना दिसेल, असे पतसंस्थेचे विश्लेषक ग्लेन लेवाईन यांनी म्हटले आहे. विदेशी गुंतवणूक मर्यादावाढ, अन्नसुरक्षा विधेयक, रिझव्र्ह बँकेचे र्निबध यांसारखे उपाय खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी फारसे उपयोगी नाहीत, असे मत प्रदर्शित करून लेवाईन यांनी देशाची आगामी वाटचाल आता आगामी निवडणुका आणि येणारे नवे सरकार यानंतर अधिक स्पष्ट होईल, असेही म्हटले आहे.
अर्थव्यवस्था सावरणे कठीण ; ‘मूडी’चा कयास
चालू आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धातही भारतीय अर्थव्यवस्था सावरण्याची चिन्हे नाहीत, असे मूडी या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.
First published on: 25-07-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian economy unlikely to see recovery in 2nd half moodys analytics