‘न्यूट्रॉस्युटिकल’ हा शब्द ‘पोषण’ आणि ‘औषधे’ यांच्या संयोगातून तयार झाला असून हे खाद्य उत्पादन प्रामुख्याने आरोग्य आणि वैद्यकीय फायदे देऊ करत असून याअंतर्गत रोगाचा प्रतिबंध आणि उपचारपद्धती समाविष्ट करण्यात आले आहे. मानवी जीवनाचे पोषण अन्नाद्वारे केले जाते. मग ते पारंपारीक स्वरुपात असो किंवा तांत्रिक प्रगतीच्या मदतीने तयार झालेल्या नवीन स्वरुपात असो.
‘फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अॅक्ट २००६ (चॅप्टर ४, सेक्शन २२) नुसार अन्नाचे वर्गीकरण खालीदिल्याप्रमाणे केले गेले पाहिजे असे सुचवण्यात आले आहे.
– नवीन खाद्यपदार्थ
– जनुकीय परिवर्तनातून तयार झालेले खाद्यपदार्थ
– उल्हसित खाद्यपदाथ्र्थ
– सेंद्रीय खाद्यपदार्थ
– विशिष्ट आहारपद्धतीकरता उपयुक्त
– फंक्शनल फूड्स
– न्यूट्रास्युटिकल्स
– आरोग्यास पूरक
यातून हे स्पष्ट दिसून येते की न्यूट्रॉस्युटिकल्स हे अन्नाचा एक भाग असतात आणि तो औषधांचा प्रकार समजला जाऊ नये.
२०१०-११ मध्ये भारतीय न्यूट्रास्युटिकल्स बाजारपेठेतील उलाढाल २ बिलियन डॉलर इतकी होती आणि २०१५ पर्यंत ती वाढून ५ बिलियन डॉलर पर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. आरोगयास पूरक आणि फंक्शनल फूड्स तसेच शीतपेये हे दोन प्रमुख विभाग आहेत.
‘न्यूट्रास्युटिकल्स’ हा औषधे आणि औषध उत्पादने व संबंधित नियमांचा भाग नसून या विभागापेक्षा वेगळा आहे. भारत सरकारने एफएसएसएआय (फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्डस अॅथॉरिटी ऑफ इंडिया) च्या माध्यमातून संबंधित कायदा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून याची अजून अंमलबजावणी झालेली नाही.
‘फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड रुल्स, २०११’ अंमलात आला असून ५ मे २०११ पासून संबंधित कार्यवाही सुरू झाली आहे. ‘फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड अॅथॉरिटी’ने परवाना आणि खाद्यव्यवसायाची नोंदणी, पॅकिंग आणि लेबिलग, अन्न उत्पादनाचा दर्जा आदीसंबंधी नियम लागू केले आहेत. त्यामुळेच आता भारतातील न्यूट्रास्युटिकल्स, फंक्शनल फूड आणि पूरक आहाराचे नियमित उत्पादन, विक्री आणि वितरण यासंबंधी एकच कायदा लागू करण्यात आला आहे. न्यूट्रास्युटिकल्स आणि प्रमाणित द्रव्ये यासंबंधी नोंदणी करताना विशिष्ट नियमांचे पालन केलेले नसेल तर आजही भारतात ‘न्यूट्रास्युटिकल्स’ आणताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते.
या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याकरता ‘ड्रग्ज अॅण्ड कॉस्मेटिक्स रुल्स, १९४५’ करता शेड्यूल के ची अंमलबजावणी करणे गरजेचे असून यातून न्यूट्रास्युटिकल्स, पूरक पोषक आहार याकरता ‘ड्रग्ज अॅण्ड कॉस्मेटिक्स अॅक्ट १०४० अॅण्ड रुल्स १०४५’ कडून काही विशिष्ट सवलती मिळू शकतील.
उत्पादनाकरता मान्यता, प्रमाणित द्रव्ये, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण इ. करता विशिष्ट परवानगी मिळवणे गरजेचे असते. कारण ‘फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अॅक्ट २००६’ अंतर्गत या विभागाला स्वतंत्र विभागाचा दर्जा दिला आहे.
भारतीय न्यूट्रॉस्युटिकल्स बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आवश्यक प्रमुख क्षेत्रांमधील उत्पादनाची चाचणी, प्रत्यक्ष उत्पादनाचे परीक्षण, खरेदीचे परवाने आदी घटकांवर प्रामुख्याने भर दिला जात असून भारतात विशिष्ट आरोग्यदायी उत्पादने तयार केली जातील.
भारतीय कायद्यानुसार औषधांची तपासणी महत्त्वपूर्ण ठरते यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांतील प्रत्येक घटक, त्यांची मात्रा योग्य आहे किंवा नाही, जीवनसत्वे/खनिजे याचे प्रमाण थेरॉप्टिक, प्रोफीलॅटिक किंवा भारतीयांसाठी तयार करण्यात आलेल्या पोषक घटकांनुसार आहे किंवा नाही हे पाहणेही गरजेचे आहे. यामध्ये उत्पादकांमध्ये सुध्दा दुमत आहे की त्यांची उत्पादने प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन अॅक्ट १९५४ आणि नियम १९५५, फूड सेफ्टी अॅंड स्टॅण्डर्डस अॅक्ट २००६, ड्रग्ज अॅन्ड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४०, आणि नियम १९५५, फूड सेफ्टी अॅन्ड स्टॅण्डर्डस रूल्स २०११ यांच्या नुसार ते खाद्य किंवा खाद्य पोषक द्रव्ये किंवा औषधे काय आहे यामध्येच एकमत नाही. उत्पादन करतांना विविध पायऱ्यांवर कायदेशीर कागदपत्रे तयार करणे त्यांवर अधिकृत संस्थांची मान्यता मिळवणे, सॅम्पल्स गोळा करणे, ती अधिकृत संस्थांकडे पाठवणे, पदार्थाचा अभ्यास, न्यायालयीन प्रक्रिया ( चौकशी, अपील प्रक्रिया आणि सुनावणी) या पूर्ण कराव्या लागतात.
भारतात उत्पादनाची नोंदणी करतांना उत्पादनानुसार विविध परवाने (४ ते ५) घ्यावे लागतात. कायदेशीर गरजांनुसार विशिष्ट उत्पादनासाठी दावे निर्माण करावे लागतात. म्हणूनच कोणत्या कायदेशीर गरजा पूर्ण कराव्या लागतात त्याची माहिती आणि कोणत्या उत्पादनासाठी दावे निर्माण करायचे आहेत याची जाणीव असणे गरजेचे असते.
भविष्यातील थेरॉप्ट्क्सि आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी व्हावी हे त्यांची शुध्दता, सुरक्षा आणि क्षमता यांवर अवलंबून असते. व्यवसाय आणि उत्पादन नीट चालावे याकरता नवीन व्यवसायात पदार्पण करणाऱ्यांना या गोष्टींची माहिती होणे गरजेचे असते त्याचबरोबर त्यांना त्यांतील महत्त्वपूर्ण घटक, किती प्रमाणात जीवनसत्वे/खनिजे यांचा वापर करणे किंवा करणे चालू शकते विविध आरोग्य कायद्यांनुसार उत्पादन कोणत्या सदरात येते त्यांचे लेबल क्लेम्स आणि त्यांची जाहिरात यांचाही विचार करणे गरजेचे असते.
(या लेखातील माहिती ‘इंटरिलक मार्केटिंग कन्सल्टन्सी’च्या अहवालावर आधारित)
भारतीय ‘न्यूट्रास्युटिकल्स’ बाजारपेठ २०१५ पर्यंत ५०० डॉलरची होणार
‘न्यूट्रॉस्युटिकल’ हा शब्द ‘पोषण’ आणि ‘औषधे’ यांच्या संयोगातून तयार झाला असून हे खाद्य उत्पादन प्रामुख्याने आरोग्य आणि वैद्यकीय फायदे देऊ करत असून याअंतर्गत रोगाचा प्रतिबंध आणि उपचारपद्धती समाविष्ट करण्यात आले आहे. मानवी जीवनाचे पोषण अन्नाद्वारे केले जाते. मग ते पारंपारीक स्वरुपात असो किंवा तांत्रिक प्रगतीच्या मदतीने तयार झालेल्या नवीन स्वरुपात असो.
First published on: 05-12-2012 at 05:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian nutraceuticals market grow upto 500 dollar by