रिझव्र्ह बँकेच्या उपाययोजनांचा भारतीय चलनावरील दृश्य परिणाम बुधवारी प्रत्यक्षात जाणवला. डॉलरच्या तुलनेत रुपया ६३ पैशांनी भक्कम होत ५९ च्या नजीक पोहोचला आहे. व्यवहाराखेर रुपया ५९.१३ वर स्थिरावला. गेल्या महिन्याभरातील ही दिवसातील सर्वात मोठी झेप होती. दिवसभरात रुपया ५९.०१ पर्यंत उंचावला होता. या अगोदर गेल्या दोन दिवसात त्यात ४१ पैशांची घसरण झाली होती. यामुळे चलन पुन्हा ६० ला स्पर्श करण्याच्या तयारीत होते. चलन घसरणीला थोपविण्यासाठी रिझव्र्ह बँकेने मंगळवारी बँकांकडील रोख संकुचित करण्याचे पाऊल टाकले. त्याचा योग्य तो परिणाम आता दिसून आला. स्थानिक चलनाने ८ जुलै रोजी ६१.२१ हा सर्वकालिक नीचांक दाखविला आहे.
सराफा बाजारात संमिश्रता
भांडवली बाजार तसेच चलन व्यवहारात बुधवारी मोठी घडामोड नोंदली जात असतानाच सराफा बाजारातील वातावरण मात्र संमिश्र राहिले. गेल्या दोन दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदली गेली असताना बुधवारी मात्र सोन्यामध्ये तोळ्यामागे अवघ्या ४५ रुपयांची वाढ होऊन २७,७६५ रु. वर गेला, तर चांदी किलोमागे ४२,३४५ रुपयांवर स्थिरावली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा