डॉलरच्या तुलनेत ६६च्याही तळाला जाणाऱ्या रुपयाच्या ढासळत्या मूल्याला देशांतर्गत घडामोडी जबाबदार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. डॉलरच्या तुलनेत सध्याचे रुपयाचे मूल्य हे असह्य असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
रुपयाचा सध्याचा प्रवास खूपच खालावत गेला असला तरी लवकरच चलन स्थिर पातळीवर विसावेल, असा विश्वासही पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केला. आपण ठाम आणि शांत राहायला हवे; सरकारदेखील गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दिवसभरातील भांडवली बाजार आणि परकी चलन व्यवहारात रुपयाच्या नव्या विक्रमी घसरणीच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सर्वच विकसित अर्थव्यवस्था सध्या मोठय़ा आव्हानांचा सामना करत असून, त्याचा विपरीत परिणाम हा भांडवली बाजार तसेच चलन व्यवहारावर झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. २००८ प्रमाणे दिलेला आर्थिक सहकार्याचा हात विकास आणत असला तरी वित्तीय व चालू खात्यातील तूट वाढवितो, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणले. मेपर्यंत वर्षभरात भारतीय रुपया स्थिर राहिला; मात्र मेअखेरपासून सर्वच आशियाई चलन घसरत आहेत, असे स्पष्ट करून अर्थमंत्री म्हणाले की सरकारने मंजुरी दिलेल्या १.८३ लाख कोटी रुपयांच्या २७ विविध प्रकल्पांमुळे गुंतवणूकसदृश वातावरण पुन्हा एकदा निर्माण होईल.
रुपयाची अकल्पित अवनती : चिदम्बरम
डॉलरच्या तुलनेत ६६च्याही तळाला जाणाऱ्या रुपयाच्या ढासळत्या मूल्याला देशांतर्गत घडामोडी जबाबदार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-08-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian rupee has overshot true level chidambaram