गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडझड होत असलेल्या भारतीय रुपयाने बुधवारी आतापर्यंतची सर्वांत नीचांकी गटांगळी खाल्ली. प्रति डॉलर रुपयाचा भाव ६०.३५ या आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी स्थितीवर जाऊन पोहोचला. रुपयाच्या या गटांगळीमुळे महागाई आणि चालू खात्यातील तूट फुगण्याची भीती वाढली आहे. भांडवली बाजारातील मंदीचा परिणाम विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांवर होत असून त्यांच्यामार्फत निधी काढून घेतला जात आहे. यामुळे तसेच आयातदारांकडून डॉलरची जोरदार मागणी नोंदली जात असून त्यामुळे रुपयातील घसरण वाढत चालली आहे, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.
रुपयाची पुन्हा नीचांकी गटांगळी; महागाई वाढण्याची भीती
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडझड होत असलेल्या भारतीय रुपयाने बुधवारी आतापर्यंतची सर्वांत नीचांकी गटांगळी खाल्ली.

First published on: 26-06-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian rupee sinks to all time low of rs 60 35 against us dollar