शेअर बाजारातील पडझडीचे अनुकरण करीत अथवा त्याचेच प्रत्यंतर चलन बाजारात शुक्रवारी दिसून आले. भारतीय चलन-रुपयाने सलग तिसऱ्या दिवशी डॉलरच्या तुलनेत कमजोर बनले. शुक्रवारी त्यात ३३ पैशांची आणखी मोठी घसरण झाली आणि ते डॉलरमागे ६२.१६ स्तरावर रोडावले. गुरुवारीही रुपया ५८ पैशांनी खस्तावला होता. भांडवली बाजारात विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा रुपयाच्या मूल्यावर विपरीत दबाव पडल्याचे दिसून आले. गुरुवारी भारतीय अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था दर्शविणाऱ्या चढत्या महागाई आणि घसरत्या उद्योग उत्पादनदराची आकडेवारी जाहीर झाली. त्याचवेळी अमेरिकेतील किरकोळ विक्री दराने नोव्हेंबरमध्ये उत्साहवर्धक वाढ दर्शविली. परिणामी तेथे अर्थउभारीसाठी फेडरल रिझव्र्ह बँकेकडून सुरू असलेला रोखेखरेदी कार्यक्रम हा लवकरच आटोपता घेतला जाईल, या शक्यतेने अमेरिकी डॉलर न्यूयॉर्क बाजारात मजबूत बनला. रुपयाच्या आजच्या अशक्ततेला ही बाबही कारणीभूत ठरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा