अमेरिकी डॉलरच्या समोर रुपयातील भक्कमता सलग पाचव्या व्यवहारातही कायम राहिली. ९ पैशांच्या वधारणेमुळे स्थानिक चलन मंगळवारी ६१.०४ पर्यंत उंचावले. परिणामी चलन आता गेल्या चार महिन्याच्या उच्चांकावर पोहोचले आहे.
चलनाने सोमवारी ऐतिहासिक भांडवली बाजाराला साथ देत व्यवहारात चार महिन्याचा तर दिवसअखेर दोन महिन्यांच्या उच्चांक राखला होता. या पाचही व्यवहारात मिळून रुपया १३३ पैशांनी वधारला आहे. ३ डिसेंबरपासून त्यात वाढच नोंदली गेली आहे. भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा येत असल्याचे चित्र असतानाच परकी चलन व्यवहारातही आयातदार, बँक यांच्याकडून अमेरिकन चलनाचे व्यवहार वाढले आहेत.

Story img Loader