जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी केलेल्या आशादायक वक्तव्यामुळे संबंधित देशांच्या चलनात सोमवारी तीव्र हालचाल पाहायला मिळाली. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य प्रमुख जेनेट येलेन यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या सुधाराचा रोखे खरेदीचा निर्णय तूर्त कायम असल्याने तसेच भारतात रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी भारतासारख्या विकसनशील देशाचे अर्थचित्र आगामी कालावधीत उज्ज्वल भविष्याचे असेल, या विधानाने चलनानेही मंगळवारी उसळी घेतली.
डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ७० पैशांनी भक्कम होत ६२.४१ पर्यंत वधारला. अर्थात त्याला येथील भांडवली बाजाराच्या तेजीची जोड मिळाल्याने व्यवहारात तो ६२.३७ पर्यंत झेपावला. गेल्या आठवडय़ात ६४ नजीकचा तळ गाठणाऱ्या रुपयाने यामुळे आता सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविली. चलनाची १.११ टक्के ही ३ ऑक्टोबरनंतरची सर्वात मोठी झेप राहिली.

Story img Loader