गेल्या महिन्यातील अघाऊक तसेच किरकोळ महागाई दर उंचावला असला तरी मुख्य निर्देशांक ४ टक्क्यांवर विसावल्याने रिझव्र्ह बँकेचा व्याजदर कपातीचा मार्ग मोकळा झाला आहे. फेब्रुवारीमधील किरकोळ महागाई दर १०.९१ टक्के तर घाऊक किंमत निर्देशांक ६.८४ टक्के असा गेल्या महिन्याच्या तुलनेत उंचावला असला तरी मुख्य महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली विसावला आहे. ‘क्रिसिल’च्या मते हा दर गेल्या ३५ महिन्यांनंतरचा या टप्प्यावर आला आहे.
मुख्य महागाई दर हेच रिझव्र्ह बँकेच्या चिंतेचे कारण राहिले आहे. नेमके हेच निमित्त करून मध्यवर्ती बँक व्याज दर कपातीबाबत वेळोवेली सावधानता व्यक्त करत आली आहे. गव्हर्नरांनी हा दर ५ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान असावा, असे मत यापूर्वीही व्यक्त केले आहे. आता हा दर थेट ४ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने व्याजदर कपातीची वाट मोकळी झाली आहे.
मध्यवर्ती बँकेचे मध्य तिमाही पतधोरण येत्या मंगळवारी जाहीर होत आहे. यात यंदा किमान पाव टक्क्याची व्याजदर कपात व्हावी, असा अपेक्षावजा दबाव उद्योग, बँक क्षेत्रातून निर्माण होत आहे. फेब्रुवारीमध्ये मुख्य महागाई दर ४.५१ टक्के नोंदला गेला आहे. वर्षभरापूर्वी तो याच कालावधीत ५.८२ टक्के होता. आज हा दर जाहीर होताच केंद्रीय अर्थ खाते स्तरावरूनही विकासाला चालना देणारे निर्णय यंदाच्या पतधोरणातून दिसावे, असे नमूद करत व्याजदर कपातीचे संकेत देण्यात आले.
व्याजदर कपातीस वाव!
गेल्या महिन्यातील अघाऊक तसेच किरकोळ महागाई दर उंचावला असला तरी मुख्य निर्देशांक ४ टक्क्यांवर विसावल्याने रिझव्र्ह बँकेचा व्याजदर कपातीचा मार्ग मोकळा झाला आहे. फेब्रुवारीमधील किरकोळ महागाई दर १०.९१ टक्के तर घाऊक किंमत निर्देशांक ६.८४ टक्के असा गेल्या महिन्याच्या तुलनेत उंचावला असला तरी मुख्य महागाई दर ४ टक्क्यांच्या खाली विसावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-03-2013 at 12:14 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inflation moves up to 6 84 in feb