प्रधानांचा राजीनामा, आणखी काही मोहरे गळण्याची शक्यता
बिकट अर्थस्थितीत व्यवस्थापनाची सूत्रे नव्याने हाती घेणाऱ्या एन. आर. नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिसची भारताबाहेरील व्यवसायाची महत्त्वाची जबाबदारी हाताळणाऱ्या बसब प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर होण्याची घटिका दोन दिवसांवर (शुक्रवारी) येऊन ठेपली असतानाच समूहातील विशेषत: विक्री व विपणन विभागातील आणखी मोहरे बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतातील अन्य माहिती तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणेच इन्फोसिसलाही देशाबाहेरील सेवेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या या कंपनीच्या विदेशातील व्यवसायाची जबाबदारी प्रधान यांच्यावर होती. समूहातून बाहेर पडण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे. प्रधान जागतिक विक्री व विपणनप्रमुख होते. कंपनीचे २०१५ मधील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. सध्या या पदावर कंपनीचे एक संस्थापक एस. डी. शिबुलाल आहेत. १९९४ मध्ये इन्फोसिसमध्ये आलेल्या प्रधान यांनी २००५ मध्ये इन्फोसिसमधून बाहेर पडत स्वत:ची ग्रिडस्टोन रिसर्च ही कंपनी सुरू केली होती. यानंतर २०११ मध्ये ते पुन्हा समूहात परतले. कंपनीचा व्यवसाय ४० कोटी डॉलरवरून २०० कोटी डॉलपर्यंत नेण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांच्याच कारकिर्दीत १९९५ मध्ये कंपनीचे न्यूयॉर्कमध्ये पहिले विक्री कार्यालय सुरू झाले. इन्फोसिसपूर्वी ते हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये होते.
तिमाही निकालाआधी इन्फोसिसला झटका
प्रधानांचा राजीनामा, आणखी काही मोहरे गळण्याची शक्यता बिकट अर्थस्थितीत व्यवस्थापनाची सूत्रे नव्याने हाती घेणाऱ्या एन. आर. नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिसची भारताबाहेरील व्यवसायाची महत्त्वाची जबाबदारी हाताळणाऱ्या बसब प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर होण्याची घटिका दोन दिवसांवर (शुक्रवारी) येऊन ठेपली असतानाच समूहातील विशेषत: विक्री व विपणन विभागातील आणखी मोहरे बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-07-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infosys came in problem before the quarter result