देशाच्या १०८ अब्ज डॉलर उलाढालीच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा एके काळी अग्रणी राहिलेली इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् उत्तरोत्तर या उद्योगक्षेत्रासाठी निराशेचे कारण बनू लागली आहे. आर्थिक वर्ष २०१२-१३ची चौथी तिमाही आणि संपूर्ण वर्षांचे इन्फोसिसने शुक्रवारी जाहीर केलेल्या अपेक्षेपेक्षा खूप वाईट निकालांनी एकूणच भारतातील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या आगामी वाटचालीविषयी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. इन्फोसिसच्या निकालासह भारतीय कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या हंगामाची सुरुवातच निराशाजनक झाल्याचे शेअर बाजारातही विपरित पडसाद उमटताना दिसले.
याच महिन्यापासून सुरू झालेल्या २०१३-१४ आर्थिक वर्षांत इन्फोसिसने अमेरिकी डॉलरमधील महसुली वाढ ही सहा ते १० टक्क्यांदरम्यान राहील, असे संकेत दिले आहेत. तर प्रमुख विश्लेषकांनी महसुली उत्पन्न १२ टक्क्यांहून अधिक असण्याचे अपेक्षित धरले होते. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या ‘नॅसकॉम’ने २०१३-१४मध्ये भारताचा माहिती-तंत्रज्ञान व्यवसाय १२-१४ टक्के दराने वाढणे अपेक्षित असल्याचा कयास व्यक्त केला आहे. या अंदाजांच्या तुलनेत प्रत्यक्षात निम्म्यानेही कामगिरी साधता येणार नाही, असे खुद्द इन्फोसिसनेच संकेत देणे गुंतवणूकदार वर्गाच्या पचनी पडले नाही.
परिणामी इन्फोसिसच्या समभागाचा भाव शुक्रवारी बाजारात तब्बल २२ टक्क्यांनी गडगडताना दिसला. गेल्या १० वर्षांत या समभागाने एका दिवसात नोंदविलेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
निकाल हंगामाची सुरुवात ‘इन्फी-निराशे’ने!
देशाच्या १०८ अब्ज डॉलर उलाढालीच्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा एके काळी अग्रणी राहिलेली इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् उत्तरोत्तर या उद्योगक्षेत्रासाठी निराशेचे कारण बनू लागली आहे. आर्थिक वर्ष २०१२-१३ची चौथी तिमाही आणि संपूर्ण वर्षांचे इन्फोसिसने शुक्रवारी जाहीर केलेल्या अपेक्षेपेक्षा खूप वाईट निकालांनी एकूणच भारतातील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या आगामी वाटचालीविषयी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-04-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infosys q4 revenue up profit down