सहकार क्षेत्रातील आघाडीच्या कल्याण जनता सहकारी बँकेने सुरुवात केलेल्या इंटरनेट व मोबाईल बँकिंग सेवेमुळे बँकेच्या खातेदारांना आता विविध सेवांबरोबरच निधी हस्तांतरणाची सोयही उपलब्ध झाली आहे.
बँकेच्या इंटरनेट व मोबाईल बँकिंग सुविधेमुळे ग्राहकांना बँक ठेवी, देयक भरणा, जमा खाते चौकशी, धनादेश मागणी आदी सेवा अहोरात्र घेता येतील.
बँकेच्या उपरोक्त दोन्ही सेवांची सुरुवात शनिवारी कल्याण येथे मुंबई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयआयटी) संगणकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. दीपक फाटक व परसिस्टंट सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
बँकेचे अध्यक्ष अॅड. सुरेश पटवर्धन, उपाध्यक्ष मधुसूदन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवडकर, संचालक मोहन आघारकर, प्रा. वसंत काणे, प्रा. विलास पेणकर आदी यावेळी उपस्थित होते.
१९७३ ची स्थापना असलेल्या कल्याण जनता सहकारी बँकेच्या महाराष्ट्रात ३२ शाखा आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा