इंटरनेटच्या माध्यमातून एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठविण्याची सुविधा सोयिस्कर असली तरी, ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तिचा बँक खाते क्रमांक आणि बँकेसंबंधीची माहिती असणे गरजेचे असल्याने ही प्रक्रिया काहीशी जिकरीची होऊन बसते. परंतु, एचडीएफसी बँकेने त्यांच्या खातेदारांसाठी ‘चिल्लर अॅप’च्या साह्याने पैसे पाठविण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुटसुटीत केली आहे. या अॅपच्या माध्यमातून एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात अथवा एचडीएफसी बँकेच्याच दुसऱ्या खात्यात तात्काळ पैसे पाठविता येतात. एचडीएफसी बँकेच्या खातेदार त्याच्याजवळील स्मार्ट फोनमध्ये ‘चिल्लर अॅप’ इन्स्टॉल करून ज्या व्यक्तिला पैसे पाठवायचे आहेत त्याचा फोन नंबर फोनबूकमधून निवडून क्षणार्धात त्या व्यक्तिच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकतो. यासाठी पैसे स्विकारणाऱ्या व्यक्तिच्या स्मार्ट फोनमध्येदेखील ‘चिल्लर अॅप’ इन्स्टॉल केलेले असणे गरजेचे आहे. सध्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांनाच या अॅपच्या पूर्ण सुविधेचा लाभ घेता येत असला, तरी इतर बँकेचे खातेधारक या अॅपच्या माध्यामातून एचडीएफसी बँकेच्या खातेधारकाकडून पैसे खात्यात जमा करून घेऊ शकतात. सध्या, एकावेळी एक हजार रुपये पाठविण्याची सुविधा असलेल्या या अॅपमध्ये दिवसाला पंचवीस हजार रुपये पाठविण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
अॅण्ड्रॉईड फोनधारक ‘चिल्लर अॅप’ गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करु शकतात. ‘चिल्लर अॅप’ डाऊनलोड करण्यासाठी आणि त्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://play.google.com/store/apps/details?id=in.chillr&hl=en
त्याशिवाय, ‘चिल्लर अॅप’ वारण्यासाठीचा व्हिडिओ येथे देत आहोत…