विद्यमान घसरलेल्या बाजारभावावर होणाऱ्या इंडिया ऑईलच्या भागविक्री प्रक्रियेस केंद्रीय पेट्रोलियम खात्याने विरोध दर्शविल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय गुरुवारी फेटाळून लावला.
सार्वजनिक तेल व वायू विपणन क्षेत्रातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील (आयओसी) ५ टक्के हिस्सा विक्रीची प्रक्रिया सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर आहे. याबाबतचा निर्णय गुरुवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षित होता. मात्र खात्याचे केंद्रीय मंत्री मोईली यांनी बैठकीनंतर हा निर्णय फेटाळून लावण्यात आल्याची माहिती दिली.
गेल्या काही दिवसात कंपनीचे समभाग मूल्य रोडावले आहे. ३७५ रुपये या वर्षांतील उच्चांकापासून कंपनीचे समभाग मूल्य आता (गुरुवार रु. १९८.९५) किमान पातळीवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे या दराने भाग विक्री प्रक्रियेस मोईली यांनी विरोध दर्शविला होता. याबाबत आता पुढील आठवडय़ातील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
कंपनीतील १० टक्के निर्गुतवणुकीच्या माध्यमातून सरकारचे यापूर्वी ४,५०० कोटी रुपये उभारणीचे उद्दिष्ट होते.

Story img Loader