एक कोटी अथवा त्यावरील रकमेचा कर थकविणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे प्राप्तिकर विभागाने निश्चित केले आहे. याची अमलबजावणी चालू आर्थिक वर्षांपासूनच होणार आहे.
प्राप्तिकर विभागाने कर थकविणाऱ्यांची नावे प्रसारमाध्यमातून जाहीर करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षांपासूनच सुरू केली आहे. याअंतर्गत देशभरात आतापर्यंत ६७ करबुडवे स्पष्ट झाले आहेत. संबंधितांची नावे, थकित कर रक्कम तसेच त्यांचे पॅन कार्ड क्रमांक अथवा ते भागीदार असल्यास त्या कंपन्यांची नावे हेही आता सर्वासमोर येणार आहेत.
याबाबत सरकार राबवित असलेल्या ‘नेम अॅन्ड शेम’ धोरणानुसार, वैयक्तिक तसेच कंपनी कर भरत असलेल्यांनाही ही दंडक लागू होणार आहे. याप्रमाणे २०१६-१७ मध्ये एक कोटीपेक्षा अधिक कर थकितांची नावे जाहीर केली जाणार आहेत. ही नावे ३१ जुलै २०१७ पूर्वी जाहीर केली जातील, अशी माहिती कर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिली.
याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष मंडळाने आदेश जारी केल्याचेही हा अधिकारी म्हणाला. अशा करथकितांची नावे तसेच त्यांची ओळख ही प्राप्तीकर विभागाच्या संकेतस्थळावरही प्रदर्शित करण्यात येईल.

Story img Loader