सध्या अर्थगती डळमळीत बनलेल्या जागतिक वातावरणातून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा असलेला माहिती-तंत्रज्ञान उद्योगही झळ सोसताना दिसत आहे. विद्यमान २०१२-१३ सालात १०० अब्ज डॉलरच्या या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाने वृद्धीदराबाबत व्यक्त केलेल्या पूर्वअंदाजाची खालची पातळी म्हणजे जेमतेम दोन अंकी विकासदरच अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. या उद्योगाची शिखर संघटना ‘नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस कंपनीज् (नॅसकॉम)’ने फेब्रुवारी २०१२ मध्ये चालू वर्षांत आयटी उद्योग ११-१४ टक्के दराने प्रगती करेल असे अंदाजले होते.
अनेकानेक लक्षणीय घडामोडींच्या सध्याच्या काळात आयटी उद्योगाला पूर्वअंदाजित विकासदरासंबंधी लक्ष्याचे खालचे टोक म्हणजे ११ टक्क्यांची वृद्धी विद्यमान वर्षअखेर गाठता येईल, असे ‘नॅसकॉम’ने आपले अर्धवार्षिक आढाव्यातून सोमवारी स्पष्ट केले. भारतातील शेअर बाजारात सूचिबद्ध आयटी कंपन्यांची कामगिरी, भारतात कार्यरत बहुराष्ट्रीय कंपन्या, विविध कंपन्यांकडून व्यक्त झालेले जागतिक परिप्रेक्ष्यातील विकासाविषयक पूर्वअंदाज, त्याचप्रमाणे आयटीसंलग्न सेवा, बीपीओ सेवा आणि आयटी उत्पादने उद्योगाच्या आर्थिक कामगिरीच्या अन्वये ‘नॅसकॉम’ने हा आढावा घेतला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात सध्याच्या एकूणच आव्हानात्मक काळात, आयटी उद्योगाने नाविन्यता आणि प्रत्यक्ष कामगिरी या माध्यमातून आपल्या ग्राहक कंपन्यांचे समाधान आणि वृद्धीस हातभार लावण्याचे असामान्य योगदान दिले असल्याची उचित दखल हा आढावा सादर करताना, नॅसकॉमचे चेअरमन आणि देशातील सर्वात मोठय़ा आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसचे मुख्याधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एन. चंद्रशेखरन् यांनी घेतली. ‘बाजारपेठेत सुधारणा होत असल्याचे आशावाद उत्तरोत्तर वाढत चालला आहे’, अशी पुस्तीही चंद्रशेखरन यांनी जोडली.     

आयटी उद्योग निरंतर परिवर्तन करीत नवी नव्हाळी घेत आहे. बाजारपेठ विस्तारतेय; वैश्विक प्रतिमानांचा स्वीकार करून सामथ्र्य व सक्षमतेत नित्य नवी वाढ होत आहे. स्पर्धाशीलता, कुशलता, सेवा नपुण्य आणि नाविन्यतेचा ध्यास हेच या उद्योगाचे प्रमुख आधारस्तंभ यापुढेही राहतील.
सोम मित्तल
नॅसकॉम, अध्यक्ष

कारणे
४०- ४५%  अव्वल चार-पाच आयटी सेवा पुरवठादार कंपन्यांचा देशाच्या निर्यातीतील वाटा, या कंपन्यांचे जवळपास ८० टक्के ग्राहक अरिष्टग्रस्त युरोप-अमेरिकेतील
५% देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसचा २०१३ साठी महसुली विकासाचा अंदाज
६० ते ७०  देशातील आऊटसोर्सिग उद्योगाचा नव्या देशांमध्ये विस्तार; या उद्योगाच्या सेवाकेंद्रेही वर्षभरात ४६० ते ५६० असा विस्तार
परिणाम :
अंतर्गत कुशलता आणि आर्थिक चैतन्याचे नवनवे प्रयोग सुरू असून, अनेक कंपन्यांनी नवीन कर्मचारी भरती गोठविली आहे किंवा लक्ष्य कमी केले आहे.

Story img Loader