नवी दिल्ली : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोने ‘मूनलाइटिंग’बाबत अर्थात एकाच वेळी दोन ठिकाणी काम करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांत हे कर्मचारी एकाचवेळी प्रतिस्पर्धी कंपनीचे काम करत आल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना कामावरून कमी करण्यात आले, अशी माहिती विप्रोचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी यांनी बुधवारी दिली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ‘मूनलाइटिंग’ सध्या डोकेदुखी ठरू लागली आहे. या विषयावर चर्चा होणे आवश्यक असून ही एक प्रकारे कंपनीची फसवणूक असल्याचे प्रेमजी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन प्रथा म्हणून ‘मूनलाइटिंग’बाबत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची चिंता वाढली आहे. गेल्या महिन्यात २० ऑगस्टला विप्रोचे संचालक रिशाद प्रेमजी यांनी सर्वप्रथम याबाबत आश्चर्य आणि चिंता व्यक्त करताना, हा नियोक्त्यांशी केला जाणारा विश्वासघात असल्याचे म्हटले होते. तसेच या क्षेत्रातील दुसरी आघाडीची कंपनी इन्फोसिसनेदेखील कंपनीच्या आचारसंहितेनुसार, कोणीही कर्मचारी एकाच वेळी दोन ठिकाणी काम करू शकत नाही. कोणी कर्मचारी तसे करताना आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना ‘नो टू टायिमग – नो मूनलाइटिंग’ असा कडक शब्दांत इशारा देत मूनलाइटिंगपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It services group wipro terminates 300 employees over moonlighting zws