देशाची सर्वात जलदतेने वाढ साधणारी ‘जे अ‍ॅण्ड के बँकेने (जम्मू आणि काश्मीर बँक) २०१६ पर्यंत १,८०० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविण्याचे उद्दिष्ट राखले आहे. याच दरम्यान बँक १.७० लाख कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा पार करेल, असेही बँकेने निश्चित केले आहे.
गेल्या काही तिमाहींपासून बँकेच्या मजबूत प्रदर्शनाने उत्साहित बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मुश्ताक अहमद यांनी याबाबत सांगितले की, आम्ही यापूर्वीच १.०२ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय पार केला आहे.
अहमद यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेमध्ये तणाव व सामान्य उद्योग दृश्य असूनही बँकेचे प्रदर्शन प्रभावशाली राहिले आहे. २०१५-२०१६ पर्यंत बँक १.७० लाख कोटी रुपयांचा व्यवसाय आणि १,८०० कोटी रुपयांचा निव्वळ नफ्याचा निश्चितच आकडा आम्ही पार करु.
अहमद यांनी म्हटले आहे की आमचा भर राज्याबाहेर बँकेचे जाळे सुधारण्यासह गृहामधील आक्रमक योजनेवर असेल. तीन वर्षांमध्ये १,००० शाखा सुरू करण्याचा विचार करत आहोत. पकी ८०० जम्मू आणि काश्मीरमध्ये शाखा असतील आणि २०० शाखा अन्य राज्यांमध्ये उघडण्यात येतील. बँक दुबई व लंडनमध्येही आपली उपस्थिती वाढविण्यावर विचार करत आहे, असेही ते म्हणाले.
दुसऱ्या तिमाहीमध्ये ३०२.६६ कोटी रुपयांचा नफा प्राप्त करण्यासह, बँकेचा सहामाही नफा ६१०.५८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये १८.४२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे, तिमाही लाभामध्ये १२.२९ टक्क्यांच्या वाढीपेक्षा चांगली आहे. वर्षांच्या शेवटपर्यंत बँकेला १,२६० कोटी रुपयांचा नफा प्राप्त करण्याची आशा आहे.
‘जे अ‍ॅण्ड के बँक’ देशाच्या सर्वात कमी एनपीएच्या (अनुत्पादक मालमत्ता) बँकांपकी एक असण्याची संभाव्यता आहे. पहिल्या सहामाहीच्या शेवटपर्यंत एकूण एनपीए १.६९ टक्के आणि शुद्ध एनपीए ०.१९ टक्के राहिला आहे. हे प्रमाण उद्योगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. व्याजातून होणारा बँकेचा नफा (एनआयएम) ४.३३ टक्क्य़ांवर गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा