जनकल्याण सहकारी बँकेने ‘जनकल्याणी’ ही खास महिला बचत खाते योजना गुरुवारी घोषित केली. शून्य शिलकी खाते, कर्ज व्याजदरावर सूट, जोडीला अल्पवयीन वर्गासाठी दोन खाते मोफत भेट असे लाभ देणारी ही बचत खाते योजना महिला दिनानिमित्ताने सहकार क्षेत्रात प्रथमच अवतरली आहे. महिला वर्गासाठी विशेष व्याजदर लागू करण्याचा प्रघातही ‘जनकल्याणने’च सर्वप्रथम सुरू केला होता. जनकल्याण बँकेची गेल्या १७ वर्षांपासून खातेदार असलेली प्रसिद्ध भारतीय नेमबाज अंजली वेदपाठक-भागवत हिने या योजनेचा गुरुवारी औपचारिक बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, संचालिका उज्ज्वला करंबळेकर व बँकेचे मुख्याधिकारी प्रदीप काकतकर आदींच्या उपस्थितीत शुभारंभ केला. ‘जनकल्याण’च्या मुंबई परिसरात २५ शाखा, एक विस्तारित कक्ष आहे.उज्वला करंबळेकर यांनी नव्या योजनेचे फलित म्हणून मार्च २०१३ अखेपर्यंत एक लाख नवीन खात्यांचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा