विदेशी चलन विनिमय सेवा पुरविणाऱ्या सेंट्रम डायरेक्ट अलीकडेच जेट एअरवेज या प्रवासी विमान कंपनीशी सेवाविषयक करार केला आहे. या करारातून जेट एअरवेज आपले संकेतस्थळ Jetairways.com वरून आपल्या प्रवाशी-ग्राहकांना थेट विदेशी चलन विनिमय सेवा पुरवू शकेल. संकेतस्थळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणाची तिकीटे आरक्षित करणाऱ्या प्रवाशांची विदेशी चलनाची गरज अशा तऱ्हेने जेट एअरवेजला पूर्ण करता येईल. केवळ विदेशी चलनच नव्हे, तर ट्रॅव्हलर्स चेक, प्रीपेड फॉरेक्स ट्रॅव्हल कार्ड ही सेंट्रम डायरेक्टची अन्य उत्पादनेही प्रवाशांना ऑनलाइन उपलब्ध होतील. सेंट्रम डायरेक्टची देशभरात ४५ शहरांमध्ये ९२ कार्यालये असून प्रवाशांना घरपोच सेवा प्रदान केली जाईल.
जेट एअरवेजच्या प्रवाशांच्या विदेशी चलन विनिमयाकरिता सेंट्रम डायरेक्टशी करार
विदेशी चलन विनिमय सेवा पुरविणाऱ्या सेंट्रम डायरेक्ट अलीकडेच जेट एअरवेज या प्रवासी विमान कंपनीशी सेवाविषयक करार केला आहे. या करारातून जेट एअरवेज आपले संकेतस्थळ Jetairways.com वरून आपल्या प्रवाशी-ग्राहकांना थेट विदेशी चलन विनिमय सेवा पुरवू शकेल.
First published on: 23-02-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jet airways and centrum director contract for foreign exchange