विमानोड्डाण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढीची पहिली लाभाथी जेट एअरवेज ही विमानसेवा ठरणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. संयुक्त अरब अमिरातीची हवाई सेवा ‘इतिहाद’कडून अशी गुंतवणूक आपल्या कंपनीत येत असल्याबाबत चर्चा-वाटाघाटी सध्या सुरू असल्याची अधिकृतपणे कबुली जेट एअरवेजने दिली आहे.
अद्याप अंतिम अटी-शर्ती निश्चित झालेल्या नसून, चर्चा मात्र सुरू आहे, असा खुलासा आज जेट एअरवेजकडून करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात या संबंधाने वदंता होती. जेट एअरवेजबरोबरीनेच इतिहादकडून संभाव्य गुंतवणुकीसीठी सध्या अडचणीत असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचेही नाव चर्चेत होते. पण आज या सर्व शक्याशक्यतांना पूर्णविराम देणारी जेट एअरवेजकडून कबुली आल्याने या कंपनीचा समभाग तब्बल ७ टक्क्यांनी वधारून रु. ६१८.७० या पातळीवर पोहचला.
इतिहादकडून जेट एअरवेजमध्ये २४ टक्के मालकी ही १८०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात मिळविली जाईल, असे संकेत मिळत आहेत. सर्व आवश्यक कायदेशीर आणि नियमनात्मक बाबी तपासून निश्चित होणाऱ्या अंतिम सामंजस्याची कंपनीकडून यथावकाश घोषणा केली जाईल, असे जेट एअरवेजने शेअर बाजारात गुरुवारी दाखल केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
‘इतिहाद’ला भागीदार करवून घेत असल्याची ‘जेट एअरवेज’कडून कबुली
विमानोड्डाण क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढीची पहिली लाभाथी जेट एअरवेज ही विमानसेवा ठरणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. संयुक्त अरब अमिरातीची हवाई सेवा ‘इतिहाद’कडून अशी गुंतवणूक आपल्या कंपनीत येत असल्याबाबत चर्चा-वाटाघाटी सध्या सुरू असल्याची अधिकृतपणे कबुली जेट एअरवेजने दिली आहे.
First published on: 04-01-2013 at 12:39 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jet airways confirms stake sale talks with abu dhabis etihad