इन्फोसिस, सिस्कोसारख्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी मोठी कर्मचारी कपात जाहीर केली. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर कर्मचारी कपातीचे वादळ घोंघावत असताना एकूणच अन्य क्षेत्रातील रोजगार निर्मिती व मनुष्यबळ विकासाबाबत ‘रिझ्युमे मॅनेजमेंट कन्सल्टन्सी’चे संस्थापक – संचालक गिरीश टिळक मात्र आशादायक चित्र असल्याचे स्पष्ट करतात –
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
- एकूणच माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर एकीकडे कमी महसुलाचे संकट आहे; तर दुसरीकडे कर्मचारी कपातीचा धडाकाही लावला जातोय. तुम्ही याबाबत या क्षेत्राकडे कसे पाहता?
जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर सध्या कमी महसुली उत्पन्न, घसरत्या ग्राहक कंपन्यांचे प्रमाण अशी आव्हाने आहेत. या उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या ‘नॅसकॉम’सारख्या संघटनेनेही चालू आर्थिक वर्षांसाठी या क्षेत्राच्या कमी महसुलाचे अंदाज यापूर्वीच व्यक्त केले आहेत. अमेरिका, ब्रिटनसारख्या विदेशातील व्यवसायाच्या रूपात येथील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा ८० टक्क्य़ांहून अधिक महसूल हा भारताबाहेरून येतो. येथील अनेक छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांचा व्यवसाय अशा अनेक विकसित देशांवर अवलंबून आहे. तेव्हा अशा परावलंबी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीसारखे निर्णय घेणे हे समजू शकते. व्यवसाय सावरण्यासाठी असे उपाय सर्वच स्तरात अवलंबिले जात असतात.
पण म्हणून ‘आयटी क्रेझ’ संपली असे म्हणायचे काय?
अमेरिका सावरतेय. तेथील रोजगाराची आकडेवारीही विस्तारतेय. युरोपमधून ब्रिटन बाहेर गेल्याने या भागातील अन्य व्यवसायाप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही अस्वस्थता निर्माण झाली आहे. माझ्या निरीक्षणाप्रमाणे, येथील कर्मचाऱ्यांनाही डॉलरमध्ये आणि तेही तासाच्या कार्यपद्धतीवर मिळणारे वेतन हे कुठल्यातरी वरच्या टप्प्यावर गेले होते. या क्षेत्राला कधी नव्हे ते अनन्य साधारण महत्त्व आले होते. प्रत्येकाचा एक काळ असतो. तसेच काहीसे याही क्षेत्राबाबत झाले असेच तूर्त म्हणता येईल.
- म्हणजे या क्षेत्रातील भरती आता ठप्पच म्हणायची काय?
आपल्याकडे रिटेल, ई-कॉमर्सचा जसा गवगवा झाला तसाच काहीसा प्रकार या, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबाबत होत आहे. हे सारे काही जमिनीवर येणारच होते. तरी फार अशी गंभीर परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. या क्षेत्राचे मुख्य ग्राहक असणाऱ्या बँका, वित्तीय संस्था, वाहन निर्मिती उद्योग आदी मंदीसदृश स्थितीतही उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. तेव्हा काही कालावधीसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र स्थिर असे प्रवास करण्याची शक्यता आहे. ‘कॅम्पस इंटरव्ह्य़ू’नंतर कंपन्यांमध्ये सामावून घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवाराला जोडीला ‘एमबीए’सारखे अभ्यासक्रम करण्यासही सक्तीने सांगितले जाते. अशा स्थितीत या क्षेत्रातील उमेदवार हे कर्मचाऱ्यांमध्ये रूपांतरित होण्याचे प्रमाण काहीसे संथच असेल.
- कॅपजेमिनीसारख्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये ‘अप्रायझल’वरून असलेला तणाव अन्य क्षेत्रापर्यंत पोहोचेल, अशी स्थिती आहे काय?
मुळीच नाही. उलट सेवेशी संबंधित क्षेत्राला या पुढील काळातही वाव आहेच. कर्मचारी गळती अथवा कपात, वेतनवाढ, भत्ते व इतर लाभ याबाबत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण असले तरी त्याचा प्रसार अन्य क्षेत्रातही झाला आहे, असे म्हणणे बरोबर नाही. ई-कॉमर्स वेगात तर आहेच. पण तेदेखील काही कालावधीसाठीच असेल. कारण या क्षेत्राचा पायाच मुळात ठिसूळ आहे. बाकी किरकोळ विक्री, स्थावर मालमत्ता आदी क्षेत्रातील रोजगाराबाबतची हालचाल यंदा अधिक गतीने होण्याची शक्यता आहे. आता सणांचा मोसम आहे. तेव्हा ग्राहकांची क्रयशक्तीही वाढणार आहे. अशा कालावधीत पुरेसे मनुष्यबळही लागणार आहेच. सेवा क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रात कर्मचारी आवश्यकतेची गरज भासणार आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबर कुशल, नावीन्यतेची कास धरणारे शिक्षण यांना कंपन्यांकडून कदाचित अधिक पसंती दिली जाईल. मात्र एकूणच कर्मचारी भरती अथवा रोजगार याबाबत एकदमच नकारात्मक चित्र आहे, असे मुळीच नाही.