२६ हजारापासून भरकटलेला सेन्सेक्स त्याचा पूर्वीचा स्तर पुन्हा गाठण्यास काही तयार नाही. तुलनेत म्युच्युअल फंड उद्योगाने चांगली कामगिरी बजाविली आहे. मात्र आगामी काही दिवसात दोन्ही क्षेत्रांमध्ये अधिक उत्साहवर्धक वातावरण असेल, असा विश्वास कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या समभाग विभागाचे प्रमुख रवि गोपालकृष्णन व्यक्त करतात-
– भारतीय अर्थव्यवस्थेत अद्यापही अधिक गती दिसत नाही, अशी उद्योग क्षेत्रातून ओरड आहे. या संदर्भात सध्याच्या विकास प्रवासाचे तुम्ही कसे वर्णन कराल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विकास होतोय, पण प्रत्यक्षात तसे दिसत नाही, या नाराजीत काही प्रमाणात तथ्य आहे. मात्र आता हे चित्र बदलण्याचा कालावधी सुरू झाला आहे, असे म्हणता येईल. गेल्या वर्षभरात परिस्थिती खूपच पालटली आहे. बऱ्याच आर्थिक सुधारणा आता आकारास येत आहेत. थेट विदेशी गुंतवणूक, पायाभूत सेवा, सार्वजनिक बँका यांच्याबाबतचे निर्णय गेल्या काही महिन्यांमध्ये घेतले गेले आहेत. आता तर चांगल्या मान्सूनची आशाही बाजाराला आहेच. तसे झाल्यास सर्वच चित्र एकदम पालटेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरही, २०१६ च्या सुरुवातील चिनी मंदी आपण अनुभवली. सुरुवातीची जागतिक अस्थिरताही आता स्थिर होऊ पाहत आहे.

– ..पण २०१५-१६ च्या निदान शेवटच्या तिमाहीतील कंपन्यांच्या निकालावरून तसे दिसत नाही. अनेक आघाडीच्या कंपन्या, बँका यांना तोटय़ाचा अथवा नफ्यातील घसरणीचा फटका तरी बसला आहे. त्याबाबत काय?

ते काही प्रमाणात खरे आहे. काही क्षेत्रांवर दबाव गेल्या वर्षभरात होता, हे त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या यंदाच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांवरून स्पष्ट होत आहे. काही क्षेत्रांवरील अर्थमंदीचा दबाव अजूनही कायम आहे. वाढत्या कर्जाचा भार असलेल्या कंपन्या, क्षेत्रांना येणारा थोडा कालावधीत बिकट असण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे तर आणखी एकाख-दुसरी तिमाही कंपन्या, उद्योगांसाठी आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे.

– भांडवली बाजाराबाबत काय?

बाजाराचेही तसेच काहीसे आहे. त्याबाबत वेगळे निरिक्षण नाही. निफ्टीतील अधिकाधिक कंपन्यांवर नजर टाकली तरी सूचिबद्ध अधिकतर कंपन्याची मिळकत (ईपीएस-प्रति समभाग मिळकत) निराशाजनक राहिली आहे. बाजारानेही नकारात्मक परतावा दिला आहे.

– मग नजीकच्या दिवसात यात सुधार येईल, असे वाटते काय?

निश्चितच. सूचिबद्ध कंपन्यांच्या प्रति समभाग मिळकतीबाबत दुहेरी आकडय़ातील – १० ते १२ टक्के वाढीची नक्कीच अपेक्षा आहे. तेव्हा सेन्सेक्सचा प्रवासही पूर्वीच्या ३० हजाराच्या अंदाजानजीक पोहोचू शकतो.

– खूपच आशादायी चित्र तुम्ही मांडता आहात. मग अशा स्थितीत कोणते क्षेत्र उत्साहवर्धक असतील, असे तुम्हाला म्हणायचेय?

पायाभूत सेवा, सिमेंट, ऊर्जा, भांडवली वस्तू, वाहन तसेच वाहनांचे सुटे भाग निर्मिती या क्षेत्रांचा सकारात्मक वाढीत समावेश करता येईल. देशातील बँक क्षेत्रावरील दबाव अद्याप काही कालावधीसाठी कायम असेल. मात्र बिगर बँकिंग वित्त कंपन्या/संस्था यंदा वेग पकडतील, असे दिसते. सार्वजनिक बँकांना आणखी एखादे अर्ध वित्त वर्ष संधी देण्याची गरज आहे. एकदा या बँकांना सरकारच्या भांडवलाचे पाठबळ मिळाले की त्यांच्या वाढत्या बुडीत कर्जाची समस्याही शिथिल होईल.

– भांडवली बाजाराबाबत आशावाद व्यक्त केल्यानंतर म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत तुम्ही काय सांगाल?

गुंतवणूकदारांनी आता दिर्घकालीन दृष्टिकोन बाळगावा. फंडांबाबत म्हणावयाचे झाल्यास एसआयपी हा अद्यापही उत्तम मार्ग आहे. समभागांमध्ये येत्या तीन ते चार वर्षांत चांगला परतावा मिळू शकतो. तेव्हा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून बाजारात अप्रत्यक्षरीत्या व्यवहार करून लाभ पदरात पाडून घेता येईल.

– मग, थेट बाजारात व्यवहार केल्यास.?
कंपन्यांच्या सूचिबद्ध समभागांमध्ये व्यवहार केल्यास येत्या १० वर्षांत ८ ते १० टक्के सरासरी वार्षिक परतावा मिळू शकतो. सध्या स्थावर मालमत्ता, सोने या अन्य पर्यायातील गुंतवणूक पर्यायापेक्षा हा चांगला मार्ग आहे.

– म्युच्युअल फंड व्यवसायात नियामक सेबीमुळे सध्या खूपच पारदर्शकता आली आहे. त्याबाबत आणि एकूण कॅनरा रोबेकोच्या वाटचालीबाबत काय सांगाल?

म्युच्युअल फंड व्यवसायात आलेली पारदर्शकता या उद्योगासाठी आणि एकूण गुंतवणूकदारांसाठी फायद्याचीच आहे. फंड उद्योगही त्याबाबतच्या बदलांना तयार असतोच. कॅनरा रोबेकोबाबत सांगायचे झाल्यास मार्च २०१६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने ७,९७६.८७ मालमत्ता गाठली आहे. त्यामध्ये समभागनिगडित विविध फंड योजनांमधील गुंतवणूक ३,४७५.१८ कोटी झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही वार्षिक १५ ते १६ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.

– वीरेंद्र तळेगावकर