अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत गुरूवारी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. ‘सबका साथ, सबका विकास’, हे उदिष्ट समोर ठेवूनच त्यांनी अर्थसंकल्प मांडला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वसामान्य करदात्यांसाठी करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत ५० हजारांनी वाढ, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा दोन लाखांवरून अडीच लाख आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखावरून तीन लाख इथवरच सध्यातरी ‘अच्छे दिन आएंगे’चा नारा सिमित असल्याचे दिसते आहे.  
अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी पुढलप्रमाणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • प्राप्तिकरसंबंधीचे तंटे सोडविण्यासाठी लवादाची स्थापना. 
  • ई-व्हिसा सुरू करणार.
  • देशभरात युवकांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम सुरू करणार.
  • पंतप्रधान सिंचन योजना सुरू करणार त्यासाठी १००० कोटींची तरतूद 
  • महात्मा गांधी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा, २०१९ पर्यंत कालबद्ध कार्यक्रम राबविणार
  • शहरांमधील स्वच्छता अभियानासाठी ५० हजार कोटींची तरतूद
  • ग्रामीण भागाच्या विकासासाठी गुजरात मॉडेलचा वापर करणार 
  • सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकासाठी २०० कोटींची तरतूद
  • संरक्षण क्षेत्रात ४९ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मंजुरी
  • विमा क्षेत्रात ४९ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मंजुरी
  • ‘मुली वाचवा, मुली शिकवा’ योजना सुरू करणार, त्यासाठी १०० कोटी
  • ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्तीवेतन योजना
  • देशात चार नवी एम्स रुग्णालये सुरू होणार, त्यापैकी एक महाराष्ट्रातील विदर्भात
  • देशात पाच नव्या आयआयटी, पाच नव्या आयआयएम सुरू करणार
  • लखनौ आणि अहमदाबादमधील मेट्रो प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतूद
  • मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटी
  • काश्मिरी स्थलांतरीतांसाठी रूपये ५०० कोटींची तरतूद.
  • राष्ट्रीय पोलिस स्मारक उभारण्यासाठी रूपये ५० कोटींची तरतूद.
  • लष्कराच्या ‘वन रॅंक, वन पेंशन’ योजनेसाठी रूपये १००० कोटींची तरतूद. 
  • प्रिंसेस पार्कमध्ये युध्दस्मारक उभारण्यासाठी रूपये १०० कोटींची तरतूद.
  • देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) पैकी १/६ वाटा हा शेतीचा आहे त्यामुळे देशातील शेतीच्या विकासावर भर.
  • देशभरात शेतमालाच्या साठवणूकीच्या दृष्टीने उत्तम गोदांमासाठी ५००० कोटींची तरतूद.
  • देशभरात माती परिक्षण प्रयोगशाळेसाठी ५६ कोटी रूपयांची तरतूद.
  • हरियाणा आणि तेलंगणात फलोद्यान विद्यापीठासाठी २०० कोटी रूपयांची तरतूद. 
  • शेती फायद्यात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
  • संरक्षण क्षेत्रातील परकीय गुंतवणूकीची मर्यादा ४९ टक्क्यांवर.
  • परवडणा-या घरांसाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेद्वारे रूपये ४००० कोटींची तरतूद.
  • कम्युनिटी रेडिओसाठी रूपये १०० कोटींची तरतूद. 
  • लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नावाने मध्य प्रदेशात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार. 
  • स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी रूपये ३६५० रूपयांची तरतूद.
  • महिलांसाठी दिल्लीमध्ये ‘संकट व्यवस्थापन केंद्र’स्थापन करण्यात येणार, निर्भया फंडमधून पैशाची तरतूद.
  • ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेतंर्गत ५०० कोटींची तरतूद. 
  • ‘स्मार्ट शहरे’ तयार करण्यासाठी ७०६० कोटी रूपयांची तरतूद.

 

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Key features of union budget