केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी लोकसभेत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कर रचनेत जेटलींनी यंदा कोणताही बदल न करता विविध कलमांखाली सूट देऊन दिलासा दिला आहे. जवळपास पावणे दोन तासांच्या भाषणात जेटलींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
- ग्रामीण भागातील लोकांना जास्तीत जास्त सोयी पुरवण्यावर भर.
- महागाई दर ५.४ टक्क्यांवर आणला.
- सध्या ४६ टक्के शेती आता सिंचनाखाली आहे, ही टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार.
- १७ हजार कोटी रुपये येत्या एका वर्षात सिंचनावर खर्च करणार.
- ६० हजार कोटी रुपये भूजल पातळी वाढविण्यासाठी खर्च करणार.
- ‘सॉईल हेल्थ कार्ड’ देशातील प्रत्येक शेतकऱयापर्यंत पोहोचविणार.
- शेतकऱयांना ९ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी.
- येत्या ५ वर्षात शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यादृष्टीने प्रयत्न.
- सध्या देशात ९० टक्के मधाची निर्यात, तीआणखी वाढविण्यासाठी प्रयत्न.
- प्रत्येक ग्रामपंचायतीला ८० लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध करुन देणार.
- ग्राम पंचायती आणि पालिकांसाठी २.८७ लाख कोटींची तरतूद
- नगपालिकेला वर्षाला २१ कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था.
- स्वच्छ भारत अभियानावर आतापर्यंत ९ हजार कोटी रुपये खर्च.
- देश अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी घेरलेले आहे.
- संकटांशी सामना करूनही देश विकासपथावर.
- प्रधानमंत्री फसल विमान योजना फायद्याची.
- १८ हजार ५४२ गावांमध्ये वीज पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न.
- ३ वर्षात ५ लाख हेक्टर जमीन सेंद्रीय शेतीखाली आणणार.
- गरीब महिलांच्या नावे एलपीजी सिलिंडर देणार, त्यासाठी २ हजार कोटींची तरतूद.
- ‘मनरेगा’साठी ३८ हजार ५०० कोटींची व्यवस्था.
- दीड कोटी भारतीयांना गॅस कनेक्शन देणार.
- डाळ उद्योगासाठी ५०० कोटींची तरतूद.
- शेतकऱयांना हमी भाव मिळावा यासाठी ऑनलाईन पद्धतीने माल विकत घेणार.
- ६२ नव्या नवोदय विद्यालयांची स्थापना करणार.
- उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध होणार.
- नाबार्डच्या माध्यमातून २० हजार कोटी उभारण्याचा प्रयत्न
- बी-बियाणे तपासणीसाठी देशात २ हजार प्रयोगशाळा उभारणार.
- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना १५०० केंद्रांतून राबवणार.
- स्वस्त दरात औषधं पुरवणारी ३ हजार दुकानं सुरू करणार.
- ९७ हजार कोटी रुपये ग्रामसडक योजनासाठी खर्च करणार.
- रस्ते आणि रेल्वेसाठी २ लाख १८ हजार कोटी खर्च करु.
- वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तरुणांना संधी देणार.
- सार्वजनिक वाहतूकीत आता जुनी परमिट योजना मोडीत काढणार.
- खासगी बसेस वेगवेगळ्या मार्गांवर चालविण्याची मुभा असणार.
- वापरात नसलेली देशातील १६० विमानतळं पुन्हा सुरू करणार.
- अणुवीजनिर्मितीसाठी वर्षाला ३ हजार कोटी रुपयांची तरतूद.
- धोकादायक स्थितीत काम करणाऱया ऑईल कंपन्यांना नफा वाढवून देण्याचा प्रयत्न करणार.
- अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी १०० टक्के परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील.
- २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात वीज.
- प्रत्येक कुटुंबाला १ लाखाचे विमा कवच मिळणार.
- चिटफंड घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी नवा कायदा आणणार.
- वर्षभरात १० हजार किमीचे रस्ते निर्मितीसाठी सरकारने पुढाकार घेतला.
- येत्या ३ वर्षात देशातील सर्व पोस्ट ऑफीस कार्यालयात एटीएम मशीन लावणार.
- दुग्ध व्यवसायाच्या विकासाठी ४ नव्या योजना.
- प्रत्येक जिल्यात डायलिसिस केंद्र सुरू करणार.
- सरकारी विमा कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत करणार.
- खतांची सबसिडी थेट शेतकऱयांच्या खात्यात जमा करण्याचा विचार.
- ‘स्टार्टअप’साठी लागणार परवाना एका दिवसात मिळणार.
- सरकारी तोटा नियंत्रित करण्याचा सरकारचा प्रयत्न.
- सरकारी तिजोरीला बसणारा फटका ३.५ टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न.
- बुडीत बँकांना जिवंत करण्यासाठी २५ हजार कोटी.
- कमीत कमी ३०० दिवस काम करण्याचा नियम २४० दिवसांवर आणला.
- घरभाड्यावरील कर सवलत मर्यादा २४ हजारांवरून ६० हजारांवर.
- पाच लाखांपर्यंत कमाई असणाऱया नोकरदारांना करात ३ हजाराचा फायदा.
- अर्थसंकल्प सादरीकरणावेळी शेअर बाजार घसरला, २६२ अकांची घसरण.
- पहिलं घर विकत घेणाऱयांना ५० हजारांची सवलत मिळणार.
- १० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्या महागणार.
- १ कोटी कमाई असणाऱयांना अधिभार वाढला, १२ टक्क्यांवरुन थेट १५ टक्क्यांवर.
- कररचनेत कोणताही बदल नाही.
- काळा पैसा धारकांना स्वच्छेने काळा पैशासंदर्भातील माहिती जाहिर करण्यासाठी ४ महिन्यांची मुदत.
- कर थकबाकी, दंड आणि व्याज माफीसाठी वन टाईम तंटा निवारण योजना.
- पूर्व लक्ष्य पद्धतीने कर्जदारांचा आढावा घेण्यासाठी महसूल खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना.
- नव उत्पादनांवरील कर २५ टक्के इतका निश्चित.
- कोळसा आणि लिग्नाईटवरील अधिभारात वाढ
- देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात २०१७-१८ पर्यंत वित्तीय तूट ३ टक्क्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न.
- यंदाचा अर्थसंकल्प ९ मुद्द्यांना आधारून, २०२२ पर्यंत शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणे, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विविध सुधारणांचा यात समावेश.
- डायलिसिसच्या काही उपकरणांना सीमाशुल्कात सूट.
- १ मे २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक गावात वीज.
- कर्मचारी भविष्य निधी खाली नव्याने येणा-या कर्मचा-यांसाठी पहिली तीन वर्ष सरकारचे योगदान ८.३३ टक्के राहील.
- ‘स्टार्ट-अप’अंतर्गत उद्योगांना ३ वर्षांसाठी कर सवलत.
- ‘स्टॅण्ड अप इंडिया’साठी ५०० कोटींची तरतूद.
- रस्ते आणि महामार्गांच्या निर्मितीसाठी ५५ हजार कोटींची तरतूद.