थकबाकी वसुलीसाठी कारवाई
उड्डाण परवाना स्थगित असल्याने पंखच छाटल्या गेलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या विमान ताफ्यावरही आता कात्री सुरू झाली आहे. कर्जाच्या ओझ्याने वाकलेल्या या कंपनीकडील थकीत रकमेच्या कारवाईपोटी भाडय़ाने विमाने देणाऱ्या अमेरिकेतील एका कंपनीने किंगफिशरची चार विमाने परत नेली आहेत तर थकीत सेवाकरापोटी सरकारी विभागाने कंपनीचे एक विमान जप्त केले आहे.
‘आयएलएफसी’ या अमेरिकेच्या कंपनीकडून किंगफिशरने सहा एअरबस जातीची विमाने भाडेतत्त्वावर घेतली होती. मात्र किंगफिशरकडून भाडय़ापोटीची रक्कम न आल्याने चार विमाने परत घेण्यात आली आहेत. सध्या ही विमाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिचा ताबा आता अमेरिकच्या कंपनीकडे आला आहे.
मूळच्या अमेरिकेच्या ‘इंटरनॅशनल लीज फायनान्स कॉर्पोरेशन’ कंपनीमार्फत विमाने भाडय़ाने दिली जातात. कंपनीच्या ताफ्यातील अशा विमानांची संख्या ४२ आहे. पैकी सहा विमाने किंगफिशरला देण्यात आली होती. किंगफिशरकडून येणे असलेल्या रकमेबाबत आयएलएफसीने स्पष्ट केलेले नाही.
दरम्यान, किंगफिशरकडून येणारी सेवा करापोटीची ६३ कोटी रुपयांची रक्कम अद्याप न मिळाल्याने कंपनीचे एक विमान जप्त करण्यात आल्याची माहिती मुंबईच्या सेवा कर विभागाचे आयुक्त एस. के. सोळंकी यांनीही मंगळवारीच दिली. विभागाकडून आलेली नोटीस आपल्याला मिळाली असून त्याला उत्तर देण्यात आले आहे, असे विजय मल्ल्या यांनी म्हटले आहे. कर्जाच्या सापळ्यातील किंगफिशरची हवाई सेवा १ ऑक्टोबरपासून ठप्पच आहे. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांनी उड्डाणे घेण्यास नकार दिल्यानंतर अखेर २४ ऑक्टोबर रोजी कंपनीतील संप संपुष्टात आला होता. मात्र हवाई महासंचलनालयाने कंपनीचा वाहतूक परवाना स्थागित केला आहे. कंपनीच्या हवाई परवान्याची मुदतही ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. नोव्हेंबरअखेरची अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर स्टेट ब केसह विविध १७ बँकांही किंगफिशरबाबत येत्या आठवडय़ात अंतिम निर्णय घेणार आहेत.
पंख छाटल्या गेलेल्या ‘किंगफिशर’च्या विमानांचीही जप्ती
उड्डाण परवाना स्थगित असल्याने पंखच छाटल्या गेलेल्या किंगफिशर एअरलाईन्सच्या विमान ताफ्यावरही आता कात्री सुरू झाली आहे. कर्जाच्या ओझ्याने वाकलेल्या या कंपनीकडील थकीत रकमेच्या कारवाईपोटी भाडय़ाने विमाने देणाऱ्या अमेरिकेतील एका कंपनीने किंगफिशरची चार विमाने परत नेली आहेत तर थकीत सेवाकरापोटी सरकारी विभागाने कंपनीचे एक विमान जप्त केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-12-2012 at 02:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kingfisher aeroplanes also seized