स्थावर मालमत्ता क्षेत्रातील आघाडीच्या पुराणिक बिल्डर्सला जागतिक भागभांडवल उभारणीतील कंपनी असलेल्या केकेआरमार्फत ३०० कोटी रुपयांचे सहकार्य मिळाले आहे. पुराणिक बिल्डर्सच्या पुण्यातील दोन गृहनिर्माण प्रकल्पांकरिता ही रक्कम उपयोगी येणार आहे.
पुराणिक बिल्डर्सतर्फे पुण्यात अ‍ॅबितांते व एल्डेआ एस्पॅनोला हे दोन निवासी प्रकल्प साकारण्यात येणार असून हे प्रकल्प बाणेर तसेच बावधन येथे असतील. येत्या पाच ते सहा वर्षांत पूर्ण होणारे हे दोन्ही प्रकल्प २,५०० कोटी रुपयांचे आहेत.
केकेआर व पुराणिक कंपनीत याबाबतचा करार झाला असून, या भागीदाराच्या माध्यमातून समूहाला या क्षेत्रात अधिक सुलभपणे कार्य करता येईल, असा विश्वास पुराणिक बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पुराणिक यांनी व्यक्त केला. पुण्यातील निवासी बांधकाम क्षेत्रात कार्य करण्यास पुरेशी संधी असून पुराणिकबरोबरच्या भागीदारीने ती साध्य होईल, असे केकेआरचे संचालक यश नाडकर्णी यांनी म्हटले आहे.
पुराणिक ही नाममुद्रा पुणे तसेच ठाण्यात अव्वल असल्याचे यानिमित्ताने पूर्वाश्रमी सिटी समूहात राहिलेले व केकेआर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नायर यांनी नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा