व्यवसाय विस्तारासाठी प्राधान्यतेने समभाग विक्रीद्वारे निधी उभारण्याच्या मॅग्मा फिनकॉर्पच्या प्रस्तावाला आघाडीच्या खासगी गुंतवणूकदार (पीई) कंपन्यांनी सज्जड सहकार्य दिले आहे. केकेआर, इंडियम व्ही आणि लिफफ्रॉग या कंपन्यांनी मॅग्मामध्ये ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.
बिगरबँकिंग वित्तसंस्था म्हणून देशभरात आघाडीवर असलेल्या मॅग्मा फिनकॉर्पतर्फे १०८ रुपये दराने ४.६२ कोटी समभाग सादर केले जाणार आहेत. दोन रुपये दर्शनी मूल्याचे हे समभाग असतील.
या चर्चेनंतर कंपनीच्या समभागाला मुंबई शेअर बाजारात दिवसअखेर ९४.९० रुपये भाव मिळाला. कंपनीचे बाजारमूल्यही २२४.११ कोटी रुपयांनी वाढून ते १,८०७.१४ कोटींवर गेले. बाजार व्यवहारानंतर कंपनीच्या संचालक मंडळाने समभाग वितरणाला मंजुरी दिली.
मॅग्मा फिनकॉर्पमध्ये अमेरिकास्थित केकेआर कंपनीने यापूर्वी २०११ मध्येही गुंतवणूक केली होती. कंपनी आता बिगरबँकिंग वित्त कंपनीत नव्याने ८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
तर इंडियन व्हॅल्यू अॅडव्हायजर्समार्फत इंडियम २२० कोटी रुपये व लिफफ्रॉग इन्व्हेस्टमेन्ट २०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
५०० कोटींच्या गुंतवणुकीची साथ
ल्ल इंडियम व्ही रु. २२० कोटी
ल्ल लिफफ्रॉग रु. २०० कोटी
ल्ल केकेआर रु. ८० कोटी
मॅग्मा फिनकॉर्पच्या निधी उभारणीला ‘पीई’ बळ
व्यवसाय विस्तारासाठी प्राधान्यतेने समभाग विक्रीद्वारे निधी उभारण्याच्या मॅग्मा फिनकॉर्पच्या प्रस्तावाला आघाडीच्या खासगी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-03-2015 at 07:42 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kkr indium leapfrog to pump rs 500cr in magma fincorp