देशात मुलींच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. परंतु सुकन्या समृद्धी या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च भागवता येईल. ही योजना वार्षिक ७.६% व्याजदर देते. ही योजना पोस्ट ऑफिसमधूनही सुरू करता येईल. या योजनेद्वारे, तुम्हाला आयकर नियमांनुसार १.५ लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते. याचा अर्थ तुम्ही दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवून कर सूट मिळवू शकता. त्याचबरोबर त्यावर मिळणारा रिटर्नही करमुक्त असतो. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत, तुम्ही तुमच्या मुलीचा जन्म झाल्यापासून तिचे वय १० वर्षांपेक्षा कमी असेपर्यंत खाते उघडू शकता. हे खाते २५० रुपयांच्या वार्षिक किमान प्रीमियमवर उघडता येते. ही योजना सुरू झाली तेव्हा किमान वार्षिक प्रीमियम १००० रुपये होता. तर कमाल मर्यादा वार्षिक १.५ लाख रुपये आहे. तुम्ही तुमच्या मुलीचे खाते पोस्ट ऑफिस आणि बँक या दोन्ही ठिकाणी उघडू शकता. हे खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षे सुरू ठेवता येते. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर यातून ५० टक्के रक्कम शिक्षणासाठी काढता येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा