शालोपयोगी वस्तू निर्मितीतील आघाडीच्या कोकुयो कॅम्लिनचा नवा प्रकल्प रायगड जिल्ह्य़ातील पाताळगंगा येथे कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पाची पायाभरणी नुकतीच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आर. व्ही. सोंजे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश धाकणे तसेच कंपनीचे कार्यकारी संचालक टाकिओ इगुची आदी यावेळी उपस्थित होते.
एकूण १४ एकर जागेवरील या प्रकल्पातून मार्कर्स, मेकॅनिकल पेन्सिल, फाइन लीड, पेन व इतर शालोपयोगी उत्पादनांची निर्मिती होईल. सौर ऊर्जा व पाणी संवर्धन प्रणालीचा उपयोग करण्यात येणारा हा प्रकल्प २०१६ पासून कार्यान्वित होईल. कंपनीने भांडारगृह उभारण्याची योजनाही हाती घेतली आहे.

Story img Loader