मराठी व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी मित्रमंडळातर्फे येत्या शनिवारी २४ नोव्हेंबर व २५ नोव्हेंबर रोजी नियोजित ‘लक्ष्य २०:२०’ ही राज्यव्यापी परिषद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. ही परिषद आता १९-२० जानेवारी २०१३ रोजी दादर (पूर्व) येथील राजा शिवाजी विद्यालय संकुलात येथेच घेण्यात येईल, असे मंडळाचे कार्यवाह किशोर साठे यांनी सांगितले.     

Story img Loader