अमेरिकेतील पोलाद कंपनी घेण्यासाठी अब्जाधीश लक्ष्मीनिवास मित्तल यांनी जपानच्या एका कंपनीबरोबर भागीदारीतील तयारी सुरू केली आहे. २०० कोटी डॉलरची ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी मित्तल यांनी जपानच्या निप्पॉनबरोबर सहकार्य केले आहे. प्रत्यक्षात तसे झाल्यास अर्सेलरनंतरचे सर्वात मोठे अधिग्रहण मित्तल समूहामार्फत होईल.
मूळच्या जर्मनीच्या थायसीनक्रूप या कंपनीच्या स्टील उत्पादननिर्मिती प्रकल्प अमेरिकेत आहे. त्याचे मूल्य दोन अब्ज डॉलरपेक्षाही अधिक आहे. ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी मित्तल यांच्या अर्सेलर मित्तल कंपनीने रस दाखविला असून निप्पॉन स्टील अ‍ॅण्ड सुमिटोमो मेटल यांच्या सहकार्याने ती खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे.
याबाबतचे वृत्त निक्की या अर्थदैनिकाने दिले आहे. कोणाचेही नाव न घेता या दैनिकाने जर्मन कंपनीने याच महिन्यात याबाबतचे संकेत दिल्याचे म्हटले आहे. याबाबतची घोषणा येत्या महिन्यात होईल, असेही सांगितले जाते.
वाहन उद्योगाला लागणाऱ्या स्टील शीटचे उत्पादन थायसीनक्रूपमार्फत अमेरिकेतील अलाबामा येथे केले जाते. ही कंपनी ताब्यात घेऊन तिचे दुप्पट उत्पादन निर्मितीचे लक्ष्य अर्सेलर मित्तल आणि निप्पॉन यांनी राखले आहे. त्यासाठीच ही कंपनी खरेदी करण्याची इच्छा दर्शविण्यात आली आहे. उभय कंपन्यांमार्फत या क्षेत्रात यापूर्वीही भागीदारी असून ऑक्टोबरमध्येच त्यांनी थायलॅण्ड आणि ऑगस्टमध्ये मेक्सिको येथे थायसीनक्रूप कार्यरत असलेल्या उत्पादननिर्मितीत शिरकाव केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा