मंगळवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणावर उर्जति पटेल समितीच्या अहवालाचे सावट व जागतिक शेअर बाजारात उभरत्या अर्थव्यवस्था संथ होण्याच्या भीतीने शेअर बाजारात सप्ताहरंभीच धरणीकंप झाला. समितीने प्रास्तावित केलेले रेपोदर महागाईच्या दरापेक्षा जास्त ठेवावे, या सुचनेमुळे रेपोदर वाढ होईल या भीतीने व्याजदर संवेदनशील क्षेत्रातील समभाग घसरणीमुळे सेन्सेक्सने ३ सप्टेंबर २०१३ पासूनची सर्वात मोठी ४२६ अंशाची घसरण नोंदविली. सेन्सेक्स २१ हजाराखाली घसरतानाच २०,७०७.४४ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १३०.९० अंश घसरण नोदवत ६,१३५.८५ वर बंद झाला. अमेरिकेच्या फेडच्या रोखे बाजार विषयक समितीची दोन दिवसीय बठकही मंगळवारपासूनच सुरु होत असून त्यात कदाचित प्रोत्साहनात्मक रोखे खरेदी आणखी कमी केली जाण्याच्या शक्यतेमुळे अर्थव्यवस्थेत रोखतेची चणचण भासण्याची ही भीती व्यक्त होत आहे. भारतातील शेअर बाजार उघडण्याच्या आधीपासून जागतिक शेअर बाजारात नरमाईचा सूर होता. मुंबई शेअर बाजाराचे बँकेक्स, भांडवली वस्तू, तेल व वायू, उर्जा, धातू, स्थावर मालमत्ता सर्वच निर्देशांची घसरण झाली. स्थावर मालमत्ता निर्देशांकाणे व्याज दरवाढण्याच्या भीतीने आजवरची सर्वात मोठी ७% ची घसरण नोंदविली.
रुपयाची दशसप्त घसरण
डॉलरच्या तुलनेत गेल्या दहा आठवडय़ात प्रथमच ६३ च्याही खाली उतरणारे भारतीय चलन सोमवारी ४४ पैशांनी कमकुवत बनले. गेल्या आठवडय़ात दोनवेळा अमेरिकन चलनापुढे ६२ च्याही खाली प्रवास करणारा रुपया सोमवारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी १४ नोव्हेंबर २०१३ च्याही खालत्या स्तरावर आला. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हमार्फत रोखे खरेदी आखडती घेण्याच्या येत्या दोन दिवसातील संभाव्य निर्णयामुळे भारतातील भांडवली बाजारातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघही आटेल, या भीतीपोटी अमेरिकन डॉलरला मागणी राहिली. परिणामी, व्यवहारात ६२.१० या वरच्या टप्प्यावर राहणारा रुपया ६३,३२ असा तळ गाठता झाला. गेल्या सलग तीन सत्रात भारतीय चलन १२९ पैशांनी, २.०९ टक्क्य़ांनी रोडावले आहे.
तुजवीण ‘रघुरामा’..
मंगळवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणावर उर्जति पटेल समितीच्या अहवालाचे सावट व जागतिक शेअर बाजारात उभरत्या अर्थव्यवस्था संथ होण्याच्या भीतीने शेअर
First published on: 28-01-2014 at 07:45 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Large indices falling due to fear of increase in interest rates