संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सर्वात मोठे खासगी रुग्णालय उभारण्याचा मान एका अनिवासी भारतीयाला मिळाला आहे.

२० कोटी डॉलरची गुंतवणूक असलेले एनएमसी रॉयल रुग्णालय हे अबुधाबीमध्ये खलिफा सिटीमध्ये उभारण्यात आले आहे. मल्टी स्पेशालिटी, मल्टि कल्चरल अशा सुविधा असलेल्या या रुग्णालयाची खाटा क्षमता ५०० आहे. क्वार्टनरी केअर आणि रेफरल सेंटर रुग्णालय म्हणून ते काम करणार आहे.

भारत आणि संयुक्त अरब अमिराती परस्परसंबंध विकसित करण्याच्या तयारीत असताना पायाभूत सुविधांमधील ही गुंतवणूक पुढे आली आहे, असे याबाबत डॉ. बी. आर. शेट्टी यांनी सांगितले.

संस्कृती आणि ज्ञान विकास विभागाचे मंत्री महामहिम शेख नहायन मबारक अल नहायन यांनी एनएमसी रॉयल रुग्णालयाचे उद्घाटन नुकतेच केले. संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीयांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के आहे.

Story img Loader