प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र न भरलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची मुदत दरवर्षी ३१ जुलैपर्यंत असते. यावेळी केंद्र सरकारने त्यामध्ये अगोदरच ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केली होती. मात्र, ३१ ऑगस्टपर्यंत अनेकानी प्राप्तिकर विवरणपत्र न भरल्याने आणखी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. करदाते आता या कालावधीपर्यंत ऑनलाईन विवरणपत्र भरू शकणार आहेत.

Story img Loader