१० लाख स्मार्टफोन तयार करणार
मोबाइल निर्मितीत चिनी कंपन्यांचे अस्तित्व कायम असतानाच दक्षिण कोरियाच्या एलजीनेही भारतातून स्मार्टफोनची निर्मिती करण्याचा संकल्प सोडला आहे. भारतात तयार होणाऱ्या कंपनीच्या स्मार्टफोनची संख्या १० लाख असेल, असेही या निमित्ताने घोषित करण्यात आले.
कंपनीच्या भारतीय बनावटीच्या दोन स्मार्टफोनचे अनावरण गुरुवारी केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले. जीडीएन एंटरप्राईझेसच्या सहकार्याने भारतात तयार करण्यात आलेल्या एलजीच्या स्मार्टफोनची किंमत ९,५०० व १३,५०० रुपये आहे.
‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत एलजी ही देशातील सर्वात मोठी स्थानिक पातळीवर मोबाइल तयार करणारी कंपनी ठरेल, असा विश्वास या वेळी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक किम कि-व्ॉन हेही उपस्थित होते.