‘एलजी’च्या दक्षिण कोरीया स्थित डिझाईन सेंटरमधील तज्ज्ञांनी जगातील पहिल्या कर्व्हड ओएलइडी टीव्हीची निर्मिती केली आहे. बुधवारी कंपनीच्या वतीने नव्या दोन उत्पादनांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये एक टीव्ही आणि एक स्मार्ट आहे.
भारतीय ग्राहक हे तंत्रज्ञानाचे चाहते असून, ‘एलजी’च्या कर्व्हड ओएलइडी टीव्हीचे व ‘जी फ्लेक्स’ फोनचे ते स्वागत करतील अशी आशा ‘एलजी’ इंडियाचे कार्यकारी संचालक सून क्नोन म्हणाले.
मात्र, कंपनी ‘जी फ्लेक्स’ फोन बाजारामध्ये नक्की केव्हा दाखल करणार आहेत या बद्दल साशंकता आहे. कारण या फोनची घोषणा गेल्या वर्षीच करण्यात आली होती. हा फोन सुपर स्लिम आहे. खरतर आता पर्यंतच्या स्मार्टफोनच्या इतिहासातील सर्वात स्लिम फोन आहे.  
कंपनीने डिझाईन केलेला ओएलइडी टीव्हीने या वर्षीचे ‘रेड डॉट डिझाईन’ पारितोषीक मिळवले आहे. हा टीव्ही स्मार्ट टचने कट्रोल होणार असून, त्यांचे स्टँड पारदर्शक क्रिस्टलपासून बनवण्यात आले आहे. टीव्हीच्या पुढील बाजूस असणारे स्पिकर्स दर्शकांना थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहाण्याचा आनंद देतील असा दावा कंपनीने केला आहे. कर्व्हड टीव्हीमध्ये ‘डब्ल्यूआरजीबी’ रंगसंगती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
‘एलजी’च्या ५५ इंच ओएलइडी कर्व्हड टीव्हीची किंमत असेल ९,९९,००० रूपये.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा