भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ने नवीन पारंपरिक विमा योजना ‘जीवन सुगम’ या नावाने प्रस्तुत केली आहे. ही एकरकमी हप्ता (सिंगल प्रीमियम) भरावयाची योजना केवळ मर्यादित कालावधीसाठी विक्रीस खुली असेल.
एकरकमी भरलेल्या हप्त्याच्या १० पटीने विमा कवचाची हमी देणाऱ्या या योजनेत १० वर्षे निश्चित मुदतीसाठी गुंतवणूक करता येईल. किमान विमा कवचाची रक्कम ६०,००० रु. असून कमाल गुंतवणूक रकमेबाबत कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. विमाधारकाला मुदतपूर्ती लाभ (हमी रकमेपेक्षा अधिक) अधिक लॉयल्टी बोनसचाही लाभ मिळणार आहे. जर विमा कवच रु. दीड लाखांपेक्षा अधिक असल्यास ३.५ टक्के अधिक तर विमा कवच रु. चार लाख वा त्याहून अधिक असल्यास ४.५ टक्के अतिरिक्त मुदतपूर्ती लाभ विमाधारकाला मिळेल. पॉलिसी कालावधीची पाच वर्षांच्या आत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण विमा कवच, तथापि पाच वर्षांनंतर मृत्यू झाल्यास विमा कवच अधिक लॉयल्टी बोनसचा लाभ वारसदाराला दिला जाईल. या योजनेतील गुंतवणुकीवर कलम ८० सी अन्वये करवजावटीचा लाभ विमाधारकाला मिळविता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा