अनिश्चित परिस्थितींमध्ये जीवन विमा कुटुंब आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यामध्ये मदत करतो. पुष्कळ वेळा व्यक्ती त्यांना आवश्यक असलेला विम्याचा प्रकार, प्रीमियम भरण्याची त्यांची क्षमता, विम्याचा रोख आणि अखेरीस या सर्व गरजांना पूर्ण करणारी उत्कृष्ट योजना ओळखण्यास कमी पडतात. असे असूनही, योग्य विमा कव्हरची मागणी असते की, तो ओळखण्यासाठी अतिरिक्त होमवर्क झाला पाहिजे आणि रायडर्स म्हणून संदर्भ घेऊन योग्य अॅड-ऑन्स ग्राह्य धरले पाहिजेत.
रायडर्स हे अतिरिक्त फायदे आहेत, जे गुणवत्ता आणि वेळेनुरुप दोन्हींबाबतीत विमा कव्हर वाढविण्यासाठी अत्यल्प किंमतीमध्ये तुमच्या पॉलिसीमध्ये जोडले जाऊ शकतात. ते तुमच्या विमा गरजा आणि उद्दिष्टांच्या आधारावर विमा योजना सानुकूलित करण्यामध्ये सहाय्य करतात. उपलब्ध रायडर्स इन्शुर्स आणि विमा धोरणांमध्ये विभिन्न प्रकारांत उपलब्ध असतात. ते कसे लागू केले जातात याचे नियमदेखील भिन्न असतात. विमा प्रीमियमच्या संदर्भात, रायडर्सची किंमत विमाधारकाच्या वयावर, व्यावसायिक रिस्क प्रोफाईल, त्याचे/तिची मेडिकल हेल्थ, कव्हरचा प्रकार व भाग यांवर अवलंबून असते. काही सादर करण्यात आलेले सर्वाधिक लोकप्रिय रायडर्स माहित असणे उपयुक्त ठरते.
१. वेव्हर ऑफ प्रीमियम रायडर हा रायडर सामान्यत: पारंपरिक मुदत योजना, चाईल्ड प्लॅन्स किंवा यूएलआयपीज (यूनिट िलक्ड प्लॅन्स) वाढवण्यासाठी आहे. प्राथमिक विमाधारकाचा दुर्दैवी आणि अवेळी मृत्यू किंवा अपंगत्व यामध्ये प्रीमियम रायडरच्या वेव्हरचा फायदा बराच आहे. हा रायडर आजार किंवा अपघातामुळे उद्भवणाऱ्या आíथक समस्यांमध्ये प्राथमिक विमाधारक भरण्यास असमर्थ असल्यास उर्वरित पॉलिसी कालावधीमध्ये मूळ योजना आणि संलग्न रायडर्सचे प्रिमियम्स भरण्यास सक्षम बनवितो. काही पॉलिसींमध्ये जर जीवन विमा नसेल तर प्रपोजरसाठी देखील ते लागू असते. सामान्यत हा वेव्हर ६०-७० वयामध्ये संपतो.
२. क्रिटिकल इलनेस रायडर क्रिटिकल इलनेस रायडर गंभीर आजारामध्ये विमाधारकाला पूर्ण कव्हरेज रक्कम देऊ करतो. रायडर्समध्ये निर्देशित केलेल्या गंभीर आजारांपकी कोणत्याही आजाराचे निदान झाले तर विमाधारकाला आíथक सहकार्य दिले जाते. सामान्यत: कॅन्सर, स्ट्रोक्स, फुफ्फुसांचे आजार इतर महत्त्वाच्या अवयवांच्या व्याधी इत्यादी गंभीर आजार हा रायडर कव्हर करतो. हा रायडर पारंपरिक मुदत योजनांमध्ये भर म्हणून उत्कृष्ट आहे. यामुळे विमाधारकाला लाईफ कव्हर व्यतिरिक्त सर्वसमावेशक आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो. इन्शुर्सनी विविध ग्राहक वर्गवारींच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी हा रायडर सानुकूलित केला आहे. उदाहरणार्थ, काही इन्शुर्स स्त्रियांच्या गरजा आणि जीवनशैली लक्षात घेऊन स्त्रियांसाठी डिझाईन केलेले क्रिटिकल इलनेस रायडर्स देऊ करतात.
३. अपघाती मृत्यू आणि डिस्मेंबरमेंट रायडर अपघाती मृत्यू किंवा हातपाय अथवा दृष्टी गमावणे किंवा दोन्हींमुळे येणाऱ्या अपंगत्वामध्ये जीवन विमा कव्हर केला जातो. हा रायडर अपघाती मृत्यू आणि/किंवा अपंगत्वामध्ये पॉलिसीच्या रेग्युलर डेथ बेनिफिटमध्ये किंवा त्यावर अतिरिक्त फायदा देऊ करते. त्यामुळे अचानक निर्माण होणाऱ्या दुखामध्ये कुटुंबाची स्थिती सुरक्षित राहते. या रायडरसाठी इन्शुररने प्रीमियम ठरविताना त्या व्यक्तीचा व्यवसाय, जीवनशैली, इत्यादी बाबी मुख्यत्वेकरून लक्षात घ्याव्या लागतात.
४. इन्कम बेनिफिट रायडर अपघाती अपंगत्व किंवा आजार यांमुळे व्यक्तींना अधिक काळासाठी कामापासून अलिप्त रहावे लागते. नियमित उत्पन्न मर्यादित असल्यामुळे आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढल्यामुळे कुटुंबाच्या आíथक परिस्थितीवर ताण पडतो. इन्कम बेनिफिट रायडर प्रीमियमच्या टक्केवारी माध्यमातून पुरेसे आíथक संरक्षण देऊ करते, जे रायडरच्या पूर्ण कालावधीमध्ये नियमित मासिक उत्पन्न म्हणून प्राप्त होते.
५. सर्जकिल केअर रायडर विमाधारकाला वैद्यकीय दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्जरीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले तर सर्जकिल केअर रायडर विमाधारकाच्या कुटुंबाला आíथक काळजीपासून मुक्त राहण्यास सक्षम करते. जेव्हा विमाधारक अशा आवश्यक सर्जरीमधून जातात, तेव्हा एकूण सर्व खर्च विमा कंपनी करते.
६. हॉस्पिटल केअर रायडर हॉस्पिटल केअर रायडर विमाधारक हॉस्पिटलमध्ये असताना त्याच्या कुटुंबाला आíथकदृष्टय़ा सुरक्षित ठेवतो. हा रायडर हॉस्पिटलमध्ये भरती झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आणि हॉस्पिटलायझेशनच्या संपूर्ण कालावधीसाठी कोणताही आजार किंवा इजेच्या आवश्यक वैद्यकीय उपचारासाठी डेली कॅश बेनिफिट देऊ करतो. मिळालेली फायद्याची रक्कम हॉस्पिटलमध्ये भरती होणे, आयसीयू उपचार आणि अंतिम रोगमुक्ततेसहित वेगवेगळ्या स्तरांसाठी भिन्न असते.
जीवन विमा पॉलिसी आणि रायडर्सवर निर्णय घेण्यापूर्वी पुरेसा होमवर्क आणि संशोधन करणे योग्य ठरते. तुमच्या गरजा व विमा उद्दिष्टे यांची काळजीपूर्वक यादी बनवा, पॉलिसी विकल्प व त्यांचे लाभ यांचा आढावा घ्या आणि अखेरीस तुमच्या गरजा भागवणारी सर्वसमावेशक योजना सानुकूलित करण्यासाठी सुजाण विमा एजंटशी चर्चा करा.
(लेखक बिर्ला सनलाईफ इन्शुरन्सचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)
जीवन विमा योजनेतील अतिरिक्त लाभ..
अनिश्चित परिस्थितींमध्ये जीवन विमा कुटुंब आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यामध्ये मदत करतो.
First published on: 04-02-2014 at 07:27 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life insurance scheme additional benefits