‘लोकसत्ता’च्या असंख्य वाचक-चाहत्यांमध्ये व्यापार-वित्त-उद्योगक्षेत्रातील अनेक मराठी मान्यवरांचाही समावेश होतो, पण या मंडळींचे ‘लोकसत्ता’वरील प्रेम त्यांनी वर्धापनदिन सोहळ्याला जातीने उपस्थित राहून व्यक्त केला. नरिमन पॉइंटस्थित एक्स्प्रेस टॉवर्सच्या दुसऱ्या मजल्यावर हिरवळीवर रंगलेल्या या सायंमैफलीत, या निमित्ताने राजकारणी, सनदी अधिकारी आणि अर्थक्षेत्रातील धुरिण एकत्र आले. बोचणाऱ्या गार वाऱ्याच्या साथीने मग देशाच्या गारठलेल्या अर्थव्यवस्थेवरही आणि नजीक येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उत्तरोत्तर अनिश्चित बनत चाललेल्या राजकीय वातावरणावर गरमागरम चर्चा झडणे आलेच..
*मॉन्सँटो इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सध्या
एलआयसी हौसिंग फायनान्स, महिंद्र अॅण्ड महिंद्र फायनान्शियल सव्र्हिसेस, चौगुले स्टीमशिप्स, नोसिल, जेपी मॉर्गन, इंडोको रेमिडिज, कोकुयो कॅम्लिनसारख्या अनेकानेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर असलेले धनंजय मुंगळे.*बँक ऑफ बडोदाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. रुपा रेगे आणि आदित्य बिर्ला समूहाचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे या दोन्ही अर्थतज्ज्ञांसाठी बुधवारची संध्या म्हणजे अर्थव्यवस्थेच्या मंदीच्या कारणांवर सधकबाधक उहापोहाची संधीच जणू ठरली.
*‘आयडीएफसी लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये आणि एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक वाय. एम. देवस्थळी या बँकिंग परवान्यांसाठी उत्सुक उभयतांमध्ये आणि संभाव्य प्रतिस्पध्र्याना अशा हितगुजाची संधी यापुढे क्वचितच मिळावी..*‘देशमुख बिल्डर्स’चे मोहन देशमुख    *शामराव विठ्ठल सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास जोशी*‘सॉफ्ट कॉर्नर’चे दिलीप कुलकर्णी*चौघुले समूहाच्या जयगड बंदराचे शिल्पकार अतुल कुलकर्णी*‘युनिटी इन्फ्राप्रोजेक्ट्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किशोर अवर्सेकर*सुमंगल प्रेस प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जयराज साळगावकर*‘लोकसत्ता’ आणि ‘केसरी टुर्स’चे नाते कायम पक्केच!
द इंडियन एक्स्प्रेस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस व ‘केसरी टुर्स’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील.*आम्ही दादरकर : आरझू डॉट कॉमचे मुख्याधिकारी अमलेंदू पुरंदरे यांनी दादरकर या नात्याने स्थानिक आमदार नितीन सरदेसाई यांच्याशी हितगुजाची संधी साधली.*‘टीम टीजेएसबी’: सहकार क्षेत्रातील आघाडीच्या ‘टीजीएसबी बँके’चे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन (मध्यभागी), मुख्य सर व्यवस्थापक सुनील साठे आणि संचालक रमाकांत अगरवाल.*कार्यक्रमाला सपत्निक उपस्थित असलेले ‘एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड एएमसी लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश साठे हे ‘वाइन लेडी’ अचला जोशी (उजवीकडे) यांच्याकडून या उद्योगातील गुंतवणूक तर समजून घेत नसावेत ना!*‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (डिक्की)’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, द इंडियन एक्स्प्रेस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस यांच्या समवेत.*‘गोल्डमॅन सॅक्स’चे अमित राजे संथ चाललेल्या पायाभूत सेवा क्षेत्रातील वित्त पुरवठय़ाला वेग येण्याबाबत आयडीएफसी लिमिटेडचे विक्रम लिमये व एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक वाय. एम. देवस्थळी या दोहोंना आश्वस्त करत असावेत.

Story img Loader