‘लोकसत्ता’च्या असंख्य वाचक-चाहत्यांमध्ये व्यापार-वित्त-उद्योगक्षेत्रातील अनेक मराठी मान्यवरांचाही समावेश होतो, पण या मंडळींचे ‘लोकसत्ता’वरील प्रेम त्यांनी वर्धापनदिन सोहळ्याला जातीने उपस्थित राहून व्यक्त केला. नरिमन पॉइंटस्थित एक्स्प्रेस टॉवर्सच्या दुसऱ्या मजल्यावर हिरवळीवर रंगलेल्या या सायंमैफलीत, या निमित्ताने राजकारणी, सनदी अधिकारी आणि अर्थक्षेत्रातील धुरिण एकत्र आले. बोचणाऱ्या गार वाऱ्याच्या साथीने मग देशाच्या गारठलेल्या अर्थव्यवस्थेवरही आणि नजीक येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर उत्तरोत्तर अनिश्चित बनत चाललेल्या राजकीय वातावरणावर गरमागरम चर्चा झडणे आलेच..
एलआयसी हौसिंग फायनान्स, महिंद्र अॅण्ड महिंद्र फायनान्शियल सव्र्हिसेस, चौगुले स्टीमशिप्स, नोसिल, जेपी मॉर्गन, इंडोको रेमिडिज, कोकुयो कॅम्लिनसारख्या अनेकानेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर असलेले धनंजय मुंगळे.
द इंडियन एक्स्प्रेस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस व ‘केसरी टुर्स’चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा