नवी दिल्ली : भांडवली बाजाराची नियामक संस्था ‘सेबी’चे नेतृत्व पहिल्यांदाच महिलेकडे येत असून, सोमवारी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार माधबी पुरी बुच या सेबीच्या नवीन अध्यक्षा म्हणून कार्यभार पाहतील. पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आलेले मावळते अध्यक्ष अजय त्यागी यांची त्या जागा घेतील.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रारंभिक तीन वर्षांच्या कालावधीसाठी बुच यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तथापि या संबंधाने औपचारिक आदेश लवकरच काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी सेबीच्या पूर्णवेळ संचालक म्हणून बुच यांची कारकीर्द राहिली आहे.

SEBI Chairperson Madhavi Puri Buch last month in office print eco news
‘सेबी’च्या नव्या अध्यक्षांचा अर्थमंत्रालयाकडून शोध सुरू; माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळाचा शेवटचा महिना
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
If Supriya Sule teaches some lessons to office bearers half of Maharashtra will be safe says Rupali Chakankar
सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना काही धडे दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल : रुपाली चाकणकर
Pune Airport Advisory Committee
पुणे विमानतळ सल्लागार समितीची आठ महिन्यांनंतर स्थापना
Indira Gandhi
Indira Gandhi: मलूल चेहरा, कोमेजलेलं गुलाब ते म्हातारी चेटकीण; पंतप्रधानपदी भारतीय महिला का ठरली होती चर्चेचा विषय?
Image Of NCP Ajit Pawar Party.
NCP Ajit Pawar : “आघाडी झाली तर ठीक अन्यथा…”, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अजित पवार गटाच्या नेत्याने स्पष्ट केली भूमिका
Pune Municipal Corporation appointed Yogita Bhosale as Municipal Secretary
महापालिकेच्या पहिल्या महिला नगरसचिवपदी योगिता भोसले; चार वर्षांनंतर पूर्णवेळ नगरसचिव पद
Sanjay Shirsat, CIDCO chairmanship, CIDCO ,
शिरसाट यांच्या फक्त घोषणाच! सिडको अध्यक्षपदावरील निर्णयांबाबत उलटसुलट चर्चा

नव्याने स्थापित आणि चीनमध्ये शांघाय येथे मुख्यालय असलेल्या नवीन विकास बँकेच्या बुच या सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल या खासगी गुंतवणूकदार संस्थेच्या सिंगापूरस्थित कार्यालयाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्याआधी बुच यांचा आयसीआयसीआय समूहात प्रदीर्घ कार्यकाळ राहिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या.

प्रतिष्ठित सेंट स्टिफन्स कॉलेजच्या पदवीधर असलेल्या बुच यांनी आयआयएम, अहमदाबाद येथून व्यवस्थापन शास्त्रात पदवी मिळविली आहे. सेबीचे मावळते अध्यक्ष त्यागी हे हिमाचल प्रदेशच्या १९९४ सालच्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. १ मार्च २०१७ रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आणि नंतर ऑगस्ट २०२० मध्ये त्यांचा कार्यकाळ आणखी १८ महिन्यांनी वाढवण्यात आला. सेबीच्या कायद्यानुसार, अध्यक्षाची नियुक्ती कमाल पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या ६५ व्या वर्षांपर्यंत, यापैकी जे आधी असेल त्यानुसार केली जाते. तथापि, त्यागी यांनी ज्यांच्याकडून पदभार घेतला ते यू. के. सिन्हा हे दोनदा मुदतवाढ मिळाल्याने सहा वर्षे सेबीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. तर त्याआधी सर्वात जास्त काळ म्हणजे सात वर्षांसाठी सेबीचे अध्यक्षपद हे डी. आर. मेहता यांनी भूषविले आहे.

Story img Loader