वाहन कर्ज पुरवठा क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या मॅग्मा फिनकॉर्पने आता गृहवित्त क्षेत्रातील शिरकाव घोषित केला आहे. कंपनीने जीई कॅपिटलचा कर्ज व्यवसाय ताब्यात घेत या क्षेत्रात पदार्पण केले आहे. मॅग्मा फिनकॉर्पने ६६० कोटी रुपयांची गृह कर्ज मालमत्ता आणि १९३ कोटी रुपयांची निव्वळ मालमत्ता असलेली जीई मनी हाऊसिंग फायनान्स व ९४० कोटी रुपयांची मालमत्ता असलेली जीई मनी फायनान्शिअल सव्र्हिसेसवर ताबा मिळविला आहे. चालू आर्थिक वर्षांतील दुसरे तिमाही पतधोरण जाहीर करताना रिझव्र्ह बँकने गृहवित्त कंपन्यांमार्फत १० लाख रुपयांपर्यंत गृहकर्ज हे प्राधान्य क्षेत्र कर्जवितरण म्हणून गृहित धरले जाईल, असे नमूद केले होते. याचा मोठा लाभ कंपनीला या विस्तारीकरणाच्या माध्यमातून आता होईल, असा विश्वास कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय चामरिया यांनी व्यक्त केला.
‘मॅग्मा फिनकॉर्प’ गृहवित्त क्षेत्रात ‘जीई कॅपिटल’च्या कर्ज व्यवसायावर ताबा
वाहन कर्ज पुरवठा क्षेत्रात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या मॅग्मा फिनकॉर्पने आता गृहवित्त क्षेत्रातील शिरकाव घोषित केला आहे.
First published on: 09-11-2012 at 02:36 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magma fincorp take over je capital home loan business