तीन महिने पूर्ण करीत असलेले राज्यातील भाजप युतीचे सरकार हे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने बहुविध दृष्टिकोन असलेले धोरण राबवीत असून, उद्योगधंद्यांसाठी आणि गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचे राज्य म्हणून अग्रस्थान कमावेल, असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

गेल्या १५ वर्षांत खालावलेला राज्याचा औद्योगिक विकास दर पुन्हा उंचावण्याला आपण अग्रक्रम दिला असून, ७२ किलोमीटरचा मेट्रो मार्ग, पनवेलपर्यंत एलिव्हेटेड रेल्वेमार्ग अशा महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांबरोबरच, प्रशासनात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गतिमानता विविध कामांचे विकेंद्रीकरण असे उपाय योजले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास महासंघाद्वारे शुक्रवारी आयोजित ‘महाराष्ट्र आर्थिक परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. त्यांच्या हस्ते या निमित्ताने उत्तम कामगिरी करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना पुरस्कारही प्रदान करण्यात आले. ‘बुकमाय कॅब डॉट कॉम’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गुप्ता यांनाही त्यांनी पुरस्कार दिला. महाराष्ट्रात रस्ते परिवहन विभागाकडून संमत भाडेपत्रकाप्रमाणे कॉल टॅक्सी सेवा चालविणारी बुकमायकॅब ही एकमेव कंपनी आहे, असा गौरवास्पद उल्लेखही करण्यात आला.

Story img Loader