महिंद्रा आणि महिंद्रा समूहाने काहीसा उशिरा का होईना इन्व्हर्टर तसेच बॅटरी निर्मिती क्षेत्रात अखेर विस्तार करण्याचा विडा उचललाच. यूपीएससह काही इन्व्हेर्टर आणि बॅटरी उत्पादने नव्याने सादर करत कंपनीने उत्तर प्रदेशात शिरकाव केला. कंपनीची उत्पादने सध्या महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि बिहार राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. सध्या ३७ दालनांमधूत ती विक्रीसाठी आहेत. दक्षिण भारतात चांगले प्राबल्य असलेल्या कंपनीच्या उत्पादनाची स्पर्धा आता टाटा समूहाबरोबर तीव्र होईल. पर्यावरणपूरक बॅटरीची निर्मिती सध्या टाटाकडून होते.
महिंद्राचा इन्व्हर्टर विस्तार
महिंद्रा आणि महिंद्रा समूहाने काहीसा उशिरा का होईना इन्व्हर्टर तसेच बॅटरी निर्मिती क्षेत्रात अखेर विस्तार करण्याचा विडा उचललाच. यूपीएससह काही इन्व्हेर्टर आणि बॅटरी उत्पादने नव्याने सादर करत कंपनीने उत्तर प्रदेशात शिरकाव केला.
First published on: 23-03-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra powerol forayed into the home ups inverters and battery segment in uttar pradesh